Wednesday, May 8, 2024

Latest Posts

बाहुबली फेम कटप्पाच्या मुलीच्या सौंदर्याची तारीफ…

एखादा प्रसिद्ध सेलिब्रिटी असेल तर, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची देखील अनेक चाहत्यांची इच्छा असते. त्यांचा बियो , त्यांचे कुटुंब, त्यांची लाफेस्टायल याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेते सत्यराज. अभिनेते सत्यराज हे दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध सुपरस्टार आहेत

एखादा प्रसिद्ध सेलिब्रिटी असेल तर, त्याच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची देखील अनेक चाहत्यांची इच्छा असते. त्यांचा  बायो,त्यांचे कुटुंब,त्यांची लाईफस्टाईल याविषयी जाणून घ्यायची उत्सुकता असते. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेते सत्यराज. अभिनेते सत्यराज हे दाक्षिणात्य सिनेविश्वातील प्रसिद्ध सुपरस्टार आहेत, दाक्षिणात्य अभिनेते सत्यराज यांची चर्चा कायम रंगलेली असते. सत्यराज हे प्रसिद्ध अभिनेते असले तरी, त्यांच्या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. सत्यराज यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं. सत्यराज म्हणजे बाहुबली चित्रपटातील कटप्पा . ‘बाहुबली’ सिनेमामुळे त्यांच्या लोकप्रियतेत प्रचंडता किन्वा आपण त्याला म्हणू शकतो fan following मोठा प्रमाणात वाढली. सत्यराज यांनी ‘बाहुबली’ सिनेमात ‘कटप्पा’ भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘कटप्पा’ भूमिकेमुळे सत्यराज एका रात्रीत मोठे स्टार झाले. त्यांची भूमिका आणि डायलॉगने चाहत्यांचं मन जिंकून घेतलं. आता सत्यराज यांच्या मुलीने चाहत्यांच्या मनात राज्य करायला सुरवात केली आहे.

सध्या सर्वत्र सत्यराज यांच्या मुलीच्या सौंदर्याची चर्चा रंगत आहे.कटप्पा’ भूमिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या सत्यराज यांनी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘चेन्नई एक्सप्रेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. खलनायक म्हणून त्यांनी अनेक सिनेमात भूमिका निभावली. सत्यराज यांना दोन मुलं आहेत. त्यांचा मुलगा सीबीराज वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करत आहे, तर त्यांची मुलगी दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर आहे. सत्यराज यांची मुलगी दिव्या हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, दिव्या लाइमलाइट आणि सिनेमांच्या दुनियेपासून दूर वेगळ्या क्षेत्रात स्वतःचं करियर बनवत आहे. सत्यराज यांची मुलगी दिव्या व्यवसायाने पोषणतज्ञ आहे. दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.दिव्याचे इन्स्टाग्रामवर ३ लाख ९५ हजार फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

दिव्या अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या पदार्थांसंबंधित टिप्स शेअर करत असते. ती स्वतः फिटनेस फ्रिक आहे, एवढंच नाही तर, दिव्या सर्वांना फिट राहायला शिकवते. दिव्या सत्यराजला लहानपणापासूनच खेळण्याची खूप आवड आहे. खेळताना ती अनेकदा फोटो शेअर करत असते.दिव्या झगमगत्या विश्वापासून दूर असली तरी, तिच्या सौंदर्यापुढे अभिनेत्री रश्मिता मंदाना आणि समंथा रुथ प्रभू हिचं ग्लॅमर देखील फेल आहे. सोशल मीडियावर दिव्या कायम स्वतःचे फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्री नसली तरी दिव्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दिव्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

हे ही वाचा : 

हास्यजत्रा फेम ओंकार भोजने आहे “ती” चा फक्त चाहता…

जावई केएल राहुलच्या करियरमधील खराब काळाबद्दल बोलले सासरे सुनील शेट्टी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss