Tuesday, May 7, 2024

Latest Posts

New Parliament उद्घाटनाबद्दल अनेक कलाकारांनी PM Modi चे केले अभिनंदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच आजचा दिवस भारतासाठी खूप खास आहे. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले आहे.

आज दिनांक २८ मे २०२३ (रविवार) रोजी संपूर्ण देशाचे लक्ष हे दिल्लीत सुरु असणाऱ्या सोहळ्याकडे लागले होते. याच मुख्य कारण म्हणजे आज दिल्लीत देशाच्या नवीन संसदभवनाचं उद्घाटन झालं आहे. आज अखेर देशाला नवीन संसद भवन हे मिळाल आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून संसद भवनाच्या पूजेने या सोहळ्याला सुरुवात झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच आजचा दिवस भारतासाठी खूप खास आहे. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी पीएम मोदींचे अभिनंदन केले आहे. अक्षय कुमार, हेमा मालिनी, रजनीकांत, इलैयाराजा यांसारख्या अनेक मोठं मोठ्या कलाकारांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे. सर्व सेलिब्रिटींच्या शुभेच्छांना पीएम मोदींनीही अगदी सहज उत्तर दिले आहे.

अक्षय कुमारने ट्विटरवर या नव्या इमारतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्याचा आवाज ऐकू येतो. यासोबत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘संसदेची ही भव्य नवी इमारत पाहणे अभिमानास्पद आहे. ते भारताच्या विकास कथेचे प्रतिकात्मक प्रतीक म्हणून कायम राहो.

 अनुपम खेर यांनी कविता शेअर केली. या व्हिडिओवर अनुपम खेर यांनी त्यांच्या आवाजातील एक कविता शेअर केली आहे, ज्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. ट्विट करताना अनुपम यांनी लिहिले की, ‘ही इमारत केवळ एक इमारत नाही, ती १४० कोटी देशवासीयांच्या स्वप्नांचे गंतव्यस्थान आहे.. ती त्यांच्या आशांचे प्रतीक आहे, त्यांच्या स्वाभिमानाची ती सही आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा जयजयकार.. हे आपल्या लोकशाहीचे मंदिर आहे.. वसुदैव कुटुंबकम त्याचा पाया आहे, विटेने विटेने बांधलेला आपला जगाशी संवाद आहे.. त्याच्या भिंती आपल्या श्रद्धेइतक्याच अतूट आहेत, त्याचे छप्पर हे त्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपली एकात्मता.. भारत किती तरुण आहे हे दाखवते, आपल्या इच्छा किती प्रबळ आहेत हे सांगते.. हा आपल्या गौरवशाली इतिहासाचा उत्सव आहे, हा नव्या सुरुवातीचा सण आहे.. संपूर्ण देशात सणासारखा आनंद आहे. त्याचे उद्घाटन, माझे संसद भवन, माझा अभिमान आहे!!’

 अभिनेता शाहरुख यान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या आवाजाचा व्हिडिओ शेअर केला. शाहरुखने म्हटले आहे की, आपली राज्यघटना सांभाळणाऱ्यांसाठी नवीन घर’ असे वर्णन करून शाहरुख म्हणाला, ‘नवीन संसद भवन. आपल्या आशेचे नवीन घर, आपल्या संविधानाची काळजी घेणाऱ्यांसाठी एक घर, जिथे 140 कोटी भारतीय एक कुटुंब आहेत. हे नवीन घर इतकं मोठं होवो की त्यात प्रत्येक प्रदेशातील, प्रांतातील, गावातील, शहरातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येकाला सामावून घेता येईल, या घराचे बाहू प्रत्येक जातीला, धर्माला प्रेम करेल. त्याचे डोळे इतके खोल असावेत की ते देशातील प्रत्येक नागरिकाला आणि त्यांच्या समस्या पाहू शकेल, जाणून घेऊ शकेल…. पीएम मोदींनी हा व्हिडिओ रिट्विट केला आणि लिहिले, ‘सुंदर अभिव्यक्ती! नवीन संसद भवन हे लोकशाही शक्ती आणि प्रगतीचे प्रतीक आहे…’

 अभिनेते रजनीकांत यांनी देखील ट्विट केले आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन करताना लिहिले, ‘तमिळ सत्तेचे पारंपारिक प्रतीक असलेला राजदंड भारताच्या नवीन संसद भवनात चमकेल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी तमिळांना अभिमान वाटला. यासोबतच प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी एक नागरिक म्हणून आपला उत्साह व्यक्त करताना लिहिले, ‘पंतप्रधान रविवारी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करतील. एक नागरिक म्हणून आणि विशेषतः खासदार म्हणून मी आनंदी आणि उत्साही आहे.

 अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी म्हणाल्या, ‘नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, न्याय आणि निष्पक्षतेचे प्रतीक आणि एक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा पवित्र सेंगोल स्वीकारेल आणि नवीन इमारतीत त्याची स्थापना करेल. ही देशासाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss