Thursday, May 9, 2024

Latest Posts

लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता

राज्यभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

राज्यभरात सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत.निवडणुकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. भाजप (BJP), ठाकरे गट (Thackeray Group) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण मागील काही दिवसात राज्याच्या राजकारणाला एक वेगळेच वळण लागले आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र अजूनही शिंदेंच्या शिवसेनेकडून कोणत्याही उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही.

महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. महायुतीमध्ये घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही काही जागांबाबत चर्चा सुरु आहे. या जागेंसाठी उमेदवारांची चाचपणी सध्या सुरु आहे. तर आज लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केल्या जाणार आहेत. मात्र तरीसुद्धा शिंदेंकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. आज शिंदेंच्या शिवसेनेकडून आठ जागांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या यादीमध्ये कोणाला तिकीट मिळेल आणि कोणाचे तिकीट कापले जाईल, हे स्पष्ट होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी जागावाटपा संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आज शिंदे गटाकडून जाहीर होण्याऱ्या यादीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बैठकीनंतर आनंदराव अडसूळ हे माध्यमांशी न बोलता निघून गेले. त्यामुळे ते आज अमरावतीच्या जागेबाबत काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नाशिक, यवतमाळ, रायगड, ठाणे आणि मुंबई या जागेंकडे प्रामुख्याने लक्ष दिले जात आहे. त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटेल का? तिढा सुटला असेल तर या जागा कोणाच्या वाट्याला जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हे ही वाचा:

विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करणार

लक्षवेधी वाटणाऱ्या Cheerleaders ची कमाई असते तरी किती?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss