Saturday, April 27, 2024

Latest Posts

विजय शिवतारेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट; भेटीनंतर शिवतारे भूमिका स्पष्ट करणार

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या. विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासह आनंदराव थोपटे यांची भेट घेतली होती. तसेच त्यानंतर त्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट जाऊन भेट घेतली. या भेटीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासोबत विजय शिवतारे यांची सकारात्मक भेट झाली. दरम्यान, आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे आता तोडगा निघणार का? शिवतारे खरच बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का? असे नवनवीन प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

काल रात्री विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. बैठकीमध्ये शिवतारे यांच्या पुरंदर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच शिवतारेंच्या सर्वच प्रश्नांनावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. तर आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. झालेल्या बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते. राज्यभरात सगळीकडे बारामती मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या सगळीकडे चर्चा आहेत.

बारामती मतदार संघातून विजय शिवतारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोणत्याही परिस्थितीत मी बारामती निवडणूक लढवणारचं, असा निश्चय विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवतारे यांनी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्यात रात्री उशिरा बैठक झाली. त्यामुळे आज विजय शिवतारे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत.

हे ही वाचा:

लक्षवेधी वाटणाऱ्या Cheerleaders ची कमाई असते तरी किती?

ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ‘ठाणे मुक्ती दिन’ साजरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss