Saturday, April 27, 2024

Latest Posts

लक्षवेधी वाटणाऱ्या Cheerleaders ची कमाई असते तरी किती?

आयपीएल (IPL) च्या १७ व्या पर्वाला सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि आरसीबी (CSK vs RCB) यांचा पहिला सामना चांगलाच रंगला होता. जगातील सर्वात मोठे क्रिकेट लीग म्हणून आयपीएल म्हणून नेहमी चर्चा असते. या खेळांमध्ये खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागते. जगभरातले क्रिकेटपटू आपले नशीब आजमावता. जगभरातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपासून ते स्पॉन्सर्स आणि फ्रेंचायझी यांचा तसेच मोठ-मोठ्या उद्योगपतींचा या लीगशी संबंध आहे. सामन्याच्या  वेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या चीअर गर्ल्स नक्की कमावतात किती? असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्येक सामन्यावेळी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या चीअरलीडर्सला किती मानधन मिळते? याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

आयपीएल (IPL) मध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या काही चीअरलीडर्स भारतातल्या आहेत. पण जास्त चीअरलीडर्स या  विदेशी आहेत. चीअरलीडर्सना एका सामन्याचे १२ ते २० हजार रुपये दिले जातात. त्यांच्या परफॉर्मनुसार विशेष बोनसही दिला जातो. चेन्नई, पंजाब, हैदराबाद, दिल्ली या संघाकडून चीअरलीडर्सला प्रत्येक सामन्यागणिक १२ हजार रुपये दिले जातात. राजस्थानकडून १४ ते १५ हजार रुपये दिले जातात. तर मुंबई आणि आरसीबी या संघाकडून प्रत्येक सामन्यानंतर २० हजार रुपये दिले जातात. केकेआरकडून सर्वाधिक २२ हजार रुपये प्रत्येक सामन्यानंतर दिले जातात. प्रत्येक सामन्याशिवाय चीअरलीडर्सला इतर मानधनही दिले जाते. एखाद्या वेळेस एक संघ जिंकला तर त्यांना बोनस पण दिला जातो. त्याशिवाय त्यांना चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ पण देण्यात येतात. एखादा संघ जर फायनलपर्यंत गेला तर वेगळा बोनस दिला जातो.

चीअरलीडर्सचे काम किंवा नोकरी सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी काही नियम आणि अटी असतात. आयपीएल चीअरलीडरला डान्स, मॉडेलिंग आणि गर्दीसमोर परफॉर्म करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना शरीराची काळजी घ्यावी लागते. शरीर लवचीक ठेवावे लागते. फक्त डान्स करणे हे एवढंच काम नसुन संघातील खेळाडूंना, आणि चाहत्यांना प्रोत्सहन करणे गरजेचे असते.

हे ही वाचा:

विजय शिवतारे अनंतराव थोपटे यांच्या भेटीनंतर घेणार ‘या’ मोठ्या नेत्याची भेट

मराठवाड्यात शिंदेंच्या शिवसेनेला एकच जागा मिळणार, संभाजीनगरची जागा भाजपाकडे जाण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss