Friday, April 26, 2024

Latest Posts

Gadar Trailer, २२ वर्षांनंतरही ‘गदर’चा उत्साह कमी झाला नाही, ठरलेल्या तारखेच्या आधीच रिलीज होणार ‘गदर’

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर: एक प्रेम कथा (Gadar Ek Prem Katha) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला.

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) चित्रपट गदर: एक प्रेम कथा (Gadar Ek Prem Katha) बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्याने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. तब्बल २२ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मेकर्सनी शुक्रवारी गदर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला, ज्यामध्ये सनी देओल तारा सिंगच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच सनी देओलचे चाहते ट्रेलरवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

तर अभिनेता सनी देओलने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर ‘गदर’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे, ज्यामध्ये तारा सिंग शकिना (अमिषा पटेल) तिला भारतात परत आणण्यासाठी पाकिस्तानात पोहोचते तेव्हा चित्रपटाची काही दृश्ये दिसतात. दरम्यान, तारा सिंगचा अश्रफ अली (अमरीश पुरी) सोबत जोरदार वाद झाला. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते जल्लोषात आहेत. ‘गदर’ चित्रपटगृहात पाहण्याचे त्यांचे स्वप्न आता पूर्ण होणार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

 सनी देओलचा ‘गदर: एक प्रेम कथा’ ९ जून २०२३रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. वास्तविक, ‘गदर 2’ रिलीज होण्याआधी निर्मात्यांना चित्रपटासंबंधीच्या चाहत्यांच्या आठवणी ताज्या करायच्या आहेत. याच उद्देशाने हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. तर ‘गदर 2’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा तारा सिंगच्या भूमिकेत पाकिस्तानात जाणार आहे. तर अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गदर चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येत असल्याचं म्हटलंय. ९ जून रोजी पुन्हा एकदा गदर चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय, असे अमिषाने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

 तर या ट्रेलरवर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया या दिल्या आहेत. एका यूजरने ट्रेलरवर प्रतिक्रिया दिली की, ‘गदर चित्रपटगृहात पाहणे हे एक स्वप्न होते, जे आता पूर्ण होणार आहे. पठाणचे वडील येणार आहेत. दुसर्‍याने लिहिले, ‘गदरसमोर प्रत्येक चित्रपट फिका दिसतो. चित्रपट नव्हता तर इतिहास होता. गदर हे खरे तर गदर होते. तिसऱ्या यूजरने कमेंट केली, ‘पाजी, यावेळी पाकिस्तानचा हातपंप उखडून टाकू नका, त्यांच्याकडे काही उरले नाही.’ अशाप्रकारे, ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते कमेंट करत आहेत.

हे ही वाचा:

मलेशिया सुपर ५०० बॅटमिंटन स्पर्धेत P.V sindhu आणि Prannoy यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss