Friday, May 3, 2024

Latest Posts

मलेशिया सुपर ५०० बॅटमिंटन स्पर्धेत P.V sindhu आणि Prannoy यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

सध्या मलेशिया सुपर ५०० बॅटमिंटन स्पर्धा (Malaysia Super 500 Badminton Tournament) सुरु आहेत. त्यामध्ये भारताची ओलंम्पिक स्लिव्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू आणि भारताचा बॅटमिंटनपटू एच.एस प्रणॉय या दोघांनी दमदार खेळ खेळून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

सध्या मलेशिया सुपर ५०० बॅटमिंटन स्पर्धा (Malaysia Super 500 Badminton Tournament) सुरु आहेत. त्यामध्ये भारताची ओलंम्पिक स्लिव्हर मेडलिस्ट पी.व्ही सिंधू आणि भारताचा बॅटमिंटनपटू एच.एस प्रणॉय या दोघांनी दमदार खेळ खेळून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पी.व्ही सिंधूने मलेशिया सुपर ५०० स्पर्धेत टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. प्रणॉयने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यावर्षी पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला आहे.

सिंधूने पाच महिन्याची विश्रांती घेतली होती. त्यानंतर तिने प्रथमच तिच्या लौकिकास साजेसा असा खेळ तिने दाखवला आहे. सिंधूने चीनच्या झँग यी मान हीच २१-१६, १३-२१, २२-२० असा पराभव करील. प्रणॉयला सलग तीन सामन्यांचा संघर्षाला सामोरे जावे लागले. त्याने केंता निशिमोतो याला २५-२३, १८-२१, २१-१३ असे पराभव केले. प्रणॉयने पहिल्यांदाच जपानच्या खेळाडूला पराभूत केले आहे. सध्या प्रणॉय जागतिक क्रमवारीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.

याआधी इंग्लंड स्पर्धेमध्ये सिंधू झँगविरुद्धच्या लढतीत पराभूत झाली होती. यावेळी सिंधूने तिचा खेळ सुधारत झँगला पराभूत केले आणि उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला. जानेवारीमध्ये सिंधूने खेळामध्ये पुनरागमन केले होते. तेव्हा तिने माद्रिद सुपर ३०० स्पर्धेमधील उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले होते. झँग च्या विरुद्ध तिने पहिल्या फेरीत ०-५ अशी पिछाडीवर होती त्यानंतर तिने १०-१० अशी बरोबरी केली आणि त्यानंतर तिने तिचे पॉईंट्स गमावले नाही. त्यांनतर तिने दुसरा गेम गमावला. त्यानंतर खेळ निर्णायक गेममध्ये गेला आणि दोघींमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि सिंधूने बाजी मारली.

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

Gujrat Titans ला मिळवून दिले शुभमन गिल आणि मोहित शर्माने अंतिम फेरीचे तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss