Sunday, May 5, 2024

Latest Posts

‘Made In Heaven Season 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेब सीरीजचा प्रामुख्याने समावेश येतो. टीव्ही मालिकांपेक्षाही आजच्या काळात वेब सीरीजना प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळत मिळत आहे. कुठेही व कधीही पाहता येणाऱ्या या वेब सिरीजमध्ये प्रामुख्याने नवीन व वेगळा कन्टेन्ट (Content) पाहायला मिळतो.

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये वेब सीरीजचा प्रामुख्याने समावेश येतो. टीव्ही मालिकांपेक्षाही आजच्या काळात वेब सीरीजना प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळत मिळत आहे. कुठेही व कधीही पाहता येणाऱ्या या वेब सिरीजमध्ये प्रामुख्याने नवीन व वेगळा कन्टेन्ट (Content) पाहायला मिळतो. त्यामुळेच त्याच त्याच मालिकांपासून कंटाळणारे अनेक चाहते या वेब सिरीजकडे ओढले जात आहेत. वेब सिरीजच्या दुनियातील प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी प्रसिद्ध वेब सिरीज मेड इन हेवनचा (Made in Heaven) समावेश येतो. आता तब्बल चार वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मेड इन हेवन (Made in Heaven) या मालिकेच्या वेगळेपणामुळे नेटकऱ्यांमध्ये वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. काही बोल्ड सीनमुळे ही वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात देखील सापडली होती. पण याच्या दमदार कथानक (plot) आणि अभिनयामुळे मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यातच आता तब्बल चार वर्षांनी या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामध्ये जिम सरभ, शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर आणि कल्की केकला सारखे कलावंतांनी त्यामध्ये काम केले आहे.

मेड इन हेवन या वेब सिरीजला इमी पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले होते. या वेब सिरीजचा दुसरा सीजन ऍमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) प्रदर्शित होणार आहे. या वेब सिरीजच्या निर्मात्यांकडून (Producers) सीजन २ ची घोषणा झाली असून याचे पोस्टर देखील प्रदर्शित करण्यात आले आहे. चाहते या सीजन २ साठी फार उत्सुक आहेत. तब्बल ४ वर्षांनंतर या वेब सिरीजचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सिरीजची गोष्ट दोन वेडींग प्लँनर्सच्या (Wedding planners) भोवती फिरत असून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या उतारांच्या आधारावर ही वेब सिरीज असणार आहे. शोभिता आणि अर्जून या वेब सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दरम्यान एक्सेल मीडिया आणि एंटरटेनमेंट तसेच टायगर बेबी यांनी या मालिकेची निर्मीती केली आहे.

हे ही वाचा:

दाक्षिणात्य अभिनेत्री Samantha Prabhu घेणार अभिनय क्षेत्रातून ब्रेक

कॅनडानंतर आता लंडनमध्ये Khalistan समर्थकांची रॅली, भारताविरुद्ध नवे षड्यंत्र!

अजित पवार गद्दार… दिल्लीत पोस्टरबाजी, थोरल्या पवारांचे पुढचं पाऊल काय असणार सर्वांचं लक्ष…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss