Saturday, April 27, 2024

Latest Posts

“तो” फोटो पाहून राज ठाकरे झाले भावुक …

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते – ३’च्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची या कार्यक्रमातील पहिली झलक समोर आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते – ३’च्या पहिल्या भागात पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची या कार्यक्रमातील पहिली झलक समोर आली. तर त्या पाठोपाठ त्यांचा प्रोमो आता समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ते जुने फोटो पाहून भावुक झालेले दिसत आहेत. या कार्यक्रमात गुप्ते यांनी अनेक सेलिब्रिटीस ना बोलाऊन त्याच्या मनातलं याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. खुपते तिथे गुप्ते या गर्वाचे हे चौथे सिझन आहे. आता या चौथ्या सिझन मध्ये नवीन कोणते सेलिब्रेटी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमाचे हे नवे पर्व ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रोमो पाहिल्यावर प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखी वाढलेली दिसत आहे. खुपते तिथे गुप्ते’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत गाजलेला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची दोन पर्वे यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर अनेक वर्षांनी आता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाचे तिसरे पर्व ४ जूनपासून सुरू होत आहे. या कार्यक्रमाचे वेगवेगळे प्रोमो सध्या व्हायरल होत आहेत. अशातच राज ठाकरे यांच्या या कार्यक्रमातील एका प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

‘झी मराठी’च्या सोशल मीडिया अकाउंटवरून या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये अवधूत गुप्ते राज ठाकरेंना काही जुने फोटो दाखवताना दिसत आहे. या फोटोंमध्ये बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत. यावेळी राज ठाकरे थोडे भावुक झालेले दिसले. त्यांच्यातला जिव्हाळा या फोटोंमध्ये दिसून येत आहे. हे फोटो दाखवल्यावर अवधूत गुप्तेने त्यांना विचारले की, “काय वाटतं हे सगळं एकत्र पाहून?” यावर राज ठाकरे म्हणाले, “खूप छान दिवस होते ते. माहीत नाही मला..कोणीतरी विष कालवलं किंवा नजर लागली.” यावर अवधूत म्हणाला, “आता परत येऊ नाही शकणार…” हा प्रोमो आता चांगलाच चर्चेत आला आहे.

हे ही वाचा:

कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर सनीची पहिल्यांदाच एंट्री

आदित्य नारायण होणार का बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss