Sunday, May 28, 2023

Latest Posts

कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर सनीची पहिल्यांदाच एंट्री

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली होती. सनी या कान्स फिल्म फेस्टिवलसाठी अतिशय सुंदर रित्या तयार झाली होती. सनीचा कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी केलेला लूक हा चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. सनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे कान्स मधील फोटोज हे चाहत्यांसोबत नुकतेच शेअर केले आहेत.

सनी लिओनी हीने या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उपस्थित दाखवली. सनीने तिच्या अदांजात पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले.
सनीने कान्स फिल्म फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी हिरव्या रंगाचा वन शोल्डर गाऊन घातला होता. हा अतिशय सुंदर असा हिरव्या रंगाचा गाऊन घालून तिच्या अदाकारीने घायाळ केले.
सनीने कान्स फिल्म फेस्टिवलमधील आणखी काही फोटोज सोशल मीडियावरून पोस्ट केले आहेत. हे फोटोज् कान्स फिल्म फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशीचे असून ती त्या फोटोजमध्ये अतिशय सुरेख दिसत आहे.
सनीने कान्स फिल्म फेस्टिवलच्या दुसऱ्यादिवशी काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची बेल बॉटम जीन्स घातली होती. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होते.
सनीने तिच्या नव्याकोऱ्या केनेडी नावाच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावली आहे. केनेडी नावाच्या चित्रपटाचे कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये स्क्रिनिंग होणार आहे. ह्या चित्रपटाचे अनुराग कश्यप यांनी दिग्दर्शन केले असून या चित्रपटात सनी लिओनी आणि राहुल भट्ट हे दोघे प्रमुख भूमिकेत आहेत.
केनेडी हा बॉलीवूड चा नवाकोरा चित्रपट असून तो प्रेक्षकांच्या भेटीस २४ मे २०२३ रोजी येणार आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनींग साठी सनी अगदी सुरेख दिसत होती.

हे ही वाचा : 

Sydneyमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांवर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? घ्या जाणून…

आदित्य नारायण होणार का बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी

सिडनीतून आपल्या सरकारबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss