Friday, April 26, 2024

Latest Posts

शूटिंगच्या दरम्यान सलमान खानला झाली दुखापत, चाहते चिंतेत

बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट प्रेक्षकांनी पहिला आणि त्या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले.

बॉलीवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट प्रेक्षकांनी पहिला आणि त्या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला. किसी का भाई किसी की जान हा सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. परंतु सलमान खानच्या या चित्रपटाला फार काही यश मिळाले नाही. किसी का भाई किसी की जान या चित्रपटानंतर सलमान खान याचे लगेचच त्याचा आगामी चित्रपट टायगर ३ (Tiger 3) चित्रपटाची शूटिंग सुरु केली आहे.

सलमान खानच्या याच्या टायगर ३ चित्रपटामध्ये कतरिना कैफ ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.काही दिवसांआधीच सलमान खान हा ममता बॅनर्जी यांना भेटण्यासाठी गेले होता. त्याचे अनेक फोटोस आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सलमान खानने त्याच्या टायगर ३ या चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेमध्ये आले आहेत. सलमान खानाने शेअर केलेल्या फोटोमध्ये सलमान खान याच्या पाठिला मार लागल्याचे दिसत आहेत. डाव्या हाताच्या मागे पाठिला हा मार सलमान खान याला लागला आहे. टायगर ३ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सलमान खानला ही दुखापत झाली आहे. सलमान खान याने शेअर केलेला हा फोटो आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss