Thursday, May 2, 2024

Latest Posts

एका टिचकीत मानवतेच्या दुश्मनांना आपल्या भुमीतून..KIRAN MANE यांची पोस्ट चर्चेत

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीला सुरुवात झाली असून आजपासून म्हणजेच शुक्रवार, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. देशभरात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान पार पडत असून एकूण १०२ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. मुख्यत्वे एनडीए (NDA) विरुद्ध इंडिया आघाडी (INDIA Alliance) अशी थेट लढत देशभरात लढली जाणार आहे. तामिळनाडू राज्यातील सर्व मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडत असून महाराष्ट्रात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अभिनेते किरण माने यांनी ‘एक्स’ या सोशल मीडियाच्या माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

काय म्हणाले किरण माने?

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर येथील मराठी मतदार भावाबहिणींनो… आज मतदानाला जाताना भारतात सगळ्यात जास्त व्हायरल झालेलं हे चित्र बघून जा. कारण ही ताकद आज दाखवायची वेळ आलीय. नाही वापरलीत तर कायमची गमावून बसाल ! वापरलीत तर पुढच्या अनेक पिढ्यांना वारशात दहापटींनी हे बळ द्याल. आपल्या एका बोटाला संविधानानं जग बदलायची संधी दिलीय. एका टिचकीत मानवतेच्या दुश्मनांना आपल्या भुमीतून हद्दपार करा. ही भारतभुमी द्वेषाला थारा देत नाही, प्रेमाची बीजं रूजवणारी आहे, हे दाखवून द्या.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

महाराष्ट्रात पाच मतदारसंघात मतदान पार पडत असून प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत होणार आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे. चंद्रपूर येथून भाजपाचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. रामटेक येथून शिंदे गटाचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे तर भंडारा – गोंदिया येथून भाजपचे सुनील मेंढे विरुद्ध काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे निवडणूक लढवत आहेत. गडचिरोली – चिमूर या मतदारसंघातून भाजपचे अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे नामदेव किरसाण असा सामना होत आहे.

हे ही वाचा:

‘असं’ चेक करा तुमचं मतदार यादीतील नाव…

LOKSABHA ELECTION चा पहिला टप्पा, ‘इतके’ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss