Sunday, May 5, 2024

Latest Posts

CHRISTMAS 2023: इतर सणांप्रमाणे HAPPY न म्हणता MERRY CHRISTMAS असे का म्हटले जाते?

इंग्लंडमध्ये आजही अनेक ठिकाणी मेरी ख्रिसमस ऐवजी हॅप्पी ख्रिसमस असेच म्हटले जाते. दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. परंतु, ख्रिसमससाठी 'मेरी' हा शब्द अधिक प्रचलित आहे. अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्यासाठी 'हॅप्पी' (HAPPY) सारखाच 'मेरी' (MERRY) हा शब्द वापरला जातो.

जगभरात प्रत्येक सणांना एक विशिष्ट महत्त्व लाभलेले असते. प्रत्येक धर्मानुसार साजरा करण्यात आलेल्या सणांना वेगवेगळे नाव सुद्धा देण्यात येत असतात. प्रत्येक सणांना त्यांच्या विभागानुसार वेगवेगळ्या नावाने ओळखले जात असते. तसेच, एकमेकांना शुभेच्छा देण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा फरक पडत असतो. २५ डिसेंबर हा दिवस जगभरात ख्रिसमस डे (CHRISTMAS DAY) म्हणून साजरा करण्यात येतो. येशू ख्रिस्तांच्या वाढदिवसानिमित्त हा सण साजरा करण्यात येत असतो. या दिवशी सांताक्लॉज (SANTA CLAUSE) येऊन प्रत्येकाला भेटवस्तू देतात. असा गोड गैरसमज म्हणून प्रत्येक जण या सणाचा आनंद घेत असतो आणि सिक्रेट सांता (SECRET SANTA) हा गेम खेळून प्रत्येकजण एकमेकांना गिफ्ट देत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का इतर सणाप्रमाणे आपण हॅप्पी दिवाली (HAPPY DIWALI), हॅप्पी न्यू इयर (HAPPY NEW YEAR) किंवा हॅपी दसरा (HAPPY DASARA) असं काही न म्हणता मेरी ख्रिसमस (MERRY CHRISTMAS) असं म्हणतो. मग ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना आपण एकमेकांना हॅप्पी ख्रिसमस (HAPPY CHRISTMAS) असं का म्हणत नाही? मेरी ख्रिसमस (MERRY CHRISTMAS) असंच का म्हणतो? हे जाणून घ्यायचं असेल तर हा लेख नक्की वाचा.

मेरी (MERRY) म्हणजे नक्की काय? मेरी (MERRY) या शब्दाचा अर्थ सुखी, आनंदी असा होतो. मेरी (MERRY) हा शब्द ओल्ड इंग्लिश (OLD ENGLISH) आणि जर्मन भाषेचा (GERMAN LANGUAGE) मिलाप आहे. चार्ल्स डिकन्स  (Charles Dickens) यांनी प्रचलित केला होता. त्यांनी त्यांच्या ख्रिसमस कॅरोल या पुस्तकात ‘मेरी’ हा शब्द सर्वाधिक प्रमाणात वापरला होता. त्यानंतर ‘हॅपी’ ऐवजी ‘मेरी’ हा शब्द वापरात येऊ लागला. त्याच्या आधी नागरिक ‘हॅपी ख्रिसमस’ म्हणायचे. इंग्लंडमध्ये आजही अनेक ठिकाणी मेरी ख्रिसमस ऐवजी हॅप्पी ख्रिसमस असेच म्हटले जाते. दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. परंतु, ख्रिसमससाठी ‘मेरी’ हा शब्द अधिक प्रचलित आहे. अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्यासाठी ‘हॅप्पी’ (HAPPY) सारखाच ‘मेरी’ (MERRY) हा शब्द वापरला जातो.

Latest Posts

Don't Miss