Sunday, May 5, 2024

Latest Posts

Christmas Day 2022 कसा हाेता खराेखरचा Santa Claus ?

संपूर्ण जगात सर्वात मोठ्या लोकसंख्येमध्ये साजरा होणारा सण म्हणजे ख्रिसमस, त्यालाच भारतीय उपखंडात नाताळ या नावाने ओळखले जाते.

संपूर्ण जगात सर्वात मोठ्या लोकसंख्येमध्ये साजरा होणारा सण म्हणजे ख्रिसमस, त्यालाच भारतीय उपखंडात नाताळ या नावाने ओळखले जाते. नाताळ किंवा ख्रिसमस हा एक ख्रिस्ती सण आहे. हा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. ह्या दिवशी ख्रिस्ती बांधवांचे लाडके प्रभू येशू यांचा जन्म झाला होता. तसेच सांताक्लॉजशिवाय नाताळ सण हा अपूर्ण वाटतो. चर्चमध्ये लाल-पांढऱ्या पोशाखात सांताक्लॉजची (Santa Claus) वेशभूषा केलेली मुलं आपल्याला त्या सांताची आठवण करून देतात ज्यांच्या कथा आपण लहानपणापासून ऐकल्या आहेत. विशेषत: मुलांना या दिवशी भेटवस्तू वाटप करणाऱ्या सांताची विशेष प्रतीक्षा असते, जो त्यांच्यासाठी त्यांची आवडती भेट गुपचूप ठेवतो आणि निघून जातो. आपण पाहताे की, सांताक्लॉज हे लाल आणि पांढरे कपडे परिधान केलेल्या लठ्ठ, वृद्ध माणसाची प्रतिमा आहे. तो हो-हो-हो असा हसतो. असं म्हणतात की, ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला (Christmas Day 2022) तो त्याच्या ८ रेनडिअर कारवर बसून येतो. तो त्याच्या पिशवीतून भेटवस्तू काढतो आणि मुलांमध्ये वितरित करतो.

दरवर्षी २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. दरवर्षी प्रभु येशूच्या वाढदिवसानिमित्त सांताक्लॉज देखील आनंदाचे वाटप करतात आणि मुलांना भेटवस्तू देतात. प्रत्येकजण नवीन कपडे घालून हा दिवस साजरा करतो. त्याचबरोबर भेटणाऱ्यांना मेरी ख्रिसमस म्हणत शुभेच्छा द्या. पण तुमच्या लक्षात आले आहे का की ख्रिसमसच्या दिवशी बहुतेक लोक लाल रंगाचे कपडे आणि लाल टोपी घालतात.

सांताचा पोशाख आणि माेठं पोट –

सांता नेहमी गोल आणि माेठे पोटअसलेला माणूस नव्हता. लेखक, वॉशिंग्टन इरविंग यांनी त्यांच्या १८०९ च्या “द निकरबॉकर्स हिस्ट्री ऑफ न्यू यॉर्क” या पुस्तकात सांताची प्रतिमा “चांगल्या मुलांना भेटवस्तू वितरीत करणारी सडपातळ व्यक्ती” अशी मांडली आहे.

सांताचे लाल कपडे – 

असे मानले जाते की सांता नेहमी लाल कपडे घालतो, परंतु १९ व्या शतकातील काही चित्रे दर्शवितात की तो अनेक रंगीबेरंगी कपडे घालायचा आणि झाडू घेऊन चालत असे. सांताचे वाहन हे त्याचा आवडता ८० वर्षीय रेनडिअर रुडॉल्फ होता. यावर बसून सांता भेटवस्तू वाटण्यासाठी बाहेर पडायचा.

सांता कोण आहे? –

पौराणिक कथेनुसार, सांता हा एक आनंदी माणूस आहे जो वर्षभर मुलांसाठी साथीदारांच्या मदतीने खेळणी बनवतो. असे म्हटले जाते की त्याला मुलांकडून त्यांच्या आवडत्या भेटवस्तू मागणारी पत्रे येतात. तो उत्तर ध्रुवावर त्याच्या पत्नीसोबत राहतो. पांढरी दाढी असलेल्या या आनंदी माणसाची कहाणी तुर्कीमध्ये २८० AD मध्ये सुरू झाली. संत निकोलस गरजू आणि आजारी लोकांना मदत करण्यासाठी फिरत असत. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती वंचितांच्या मदतीसाठी वापरली. असे म्हटले जाते की, त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती 3 बहिणींच्या हुंड्यासाठी दिली, ज्यांच्या वडिलांना त्यांना विकायचे होते. त्या भागातील मुलांना आणि खलाशांनाही त्यांनी खूप मदत केली.

दुसर्‍या कथेनुसार, नेदरलँडचे लोक जेव्हा न्यू वर्ल्डच्या वसाहतींमध्ये राहायला गेले तेव्हा त्यांनी सांताच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. सांता हे सेंट निकोलसचे डच भाषांतर आहे. १७०० पर्यंत, सांताच्या उदारतेच्या कथा अमेरिकेत दूरवर पोहोचल्या आणि तिथल्या पॉप संस्कृतीने त्यांची प्रतिमा बदलली. कालांतराने त्यांच्या मृत्यूनंतर त्याचे नाव सांताक्लॉज म्हणून प्रसिद्ध झाले.

हे ही वाचा:

Christmas 2022 हिंदी-इंग्रजीत नव्हे तर ऐका ‘जिंगल बेल्सचं’ व्हायरल भोजपुरी व्हर्जन ‘सांता आवेला’

Christmas 2022 BTS मेंबर V चे ‘Christmas tree’ गाणं लोकांना घालतेय भुरळ, पण या गाण्यामागे दडलेली कथा माहीत आहे का तुम्हाला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss