Thursday, May 9, 2024

Latest Posts

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

पुण्यातील नवसाला पावणारा आणि मानाच्या गणपतीचे स्थान असलेल्या दगडू शेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली? कोणी केली? त्यामागचा इतिहास काय आहे.

पुण्यातील नवसाला पावणारा आणि मानाच्या गणपतीचे स्थान असलेल्या दगडू शेठ हलवाई गणपतीची स्थापना कशी झाली? कोणी केली? त्यामागचा इतिहास काय आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दानशूर म्हणूनही ओळखला जातो. अनेक सामाजिक संस्था आणि लोकांच्या मदतीसाठी खंबीरपणे उभे राहणारे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट म्हणून ओळखले जाते. एका हलवायाने शहराच्या मध्यवर्ती भागात गणपतीची स्थापना केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील एक नामवंत मिठाईचे व्यापारी होते. पुण्यातील दत्त मंदिर हे त्यांचे राहण्याचे ठिकाण होते. त्याकाळी आलेल्या प्लेगच्या साथीच्या आजाराने त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ याना आधार दिला. त्यानंतर त्यांनी दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्यांची पूजा करा असे सांगितले. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्‍ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्‍ज्वल करतील असे देखील सांगितले होते. त्यानंतर महाराजांनी सांगितलेली मूर्ती दगडूशेठ यांनी बनवून घेतली. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ गाडवे उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यांसह सर्व थरांतील लोकांनी या समारंभाला उपस्थित होते. गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पूजा केली जाते. १८९६ साली श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपतीची स्थापना करण्यात आली होती. १९६८ साली ‘दगडूशेठ गणपती’ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली. ही मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पुर्ण झाली.मुर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.

 

गणपती बाप्पाची मूर्ती तयार होत असताना सूर्यग्रहण लागले होते. त्या ग्रहणातील विशेष वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले आहे.यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल,’ अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्या श्रद्धेचा मंडळातील कार्यकर्त्यांनी आदर केला आहे . संपुर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली. त्यानंतर १९८४ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मुर्तिची स्थापना करण्यात आली होती. या मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते. काही काळानंतर मंदिर परीसर अपुरा पडू लागल्यानंतर २०२२ साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते. आता संस्थानच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थानचे नेतृत्व आहे. मानाच्या गणपतीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे स्थान आहे.

 हे ही वाचा: 

सोप्या पद्धतीमध्ये बनवा मोदकाच्या आमटी

गणपती बापाच्या नैवेद्यासाठी बनवा शेंगदाण्याचे मोदक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss