spot_img
spot_img

Latest Posts

Ganeshotsav 2023, यंदा गणेश चतुर्थीला म्हणा हे ५ मंत्र…

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी फक्त आता एकच दिवस राहिला आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात बापाच्या आगमनाची तयारी चालू आहे.

Ganeshotsav 2023 :- लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी फक्त आता एकच दिवस राहिला आहे. सगळीकडे मोठ्या उत्साहात आणि आनंदात बापाच्या आगमनाची तयारी चालू आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते. बाप्पाचे भक्त मनोभावे गणपतीची पूजा करतात. गणपतीचे १० दिवस सगळीकडे उत्साहाच आणि आनंदाचे वातावरण असते. गणेशोत्सवात आरती , पूजा याला खूप महत्वाचे मानले जाते. घरी गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर त्याची विधिवत पूजा केल्यानंतर आरती, मंत्र बोले जातात. गणपतीच्या पूजेच्या वेळी आरती, मंत्र बोलले जातात. मंत्रोच्चार करणे शुभ मानले जाते.यामुळे नोकरी, धंद्यात प्रगती, सुख- समृद्धी आणि संकट दूर करण्यासाठी गणपतीकडे साकडं घातले जाते. गणपती चतुर्थीच्या दिवशी २१ वेळा मंत्राचा जप केल्यास गणपती बाप्पा प्रसन्न होतो असे म्हंटले जाते. पण काहीवेळा कामातून शक्य नसल्यास दिवसातून एकदातरी गणपती मंत्रांचा आवर्जून करा. चला तर पाहुयात कोणती आहेत ती पाच गणपती मंत्र

दीर्घायुष्य मंत्र

नारद उवाच, प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्,
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुःकामार्थ सिद्धये.

विशेष इच्छा पूर्ती मंत्र

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरु गणेश,
ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, मेरे दूर करो क्लेश.

गणेश गायत्री मंत्र
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात्।
गं क्षिप्रप्रसादनाय नम: .

गणपतीला प्रसन्न करण्याचा मंत्र
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

गणेश मनोकामना पूर्ती मंत्र
ॐ गं गणपतये नमः

हे ही वाचा: 

गौरीच्या नैवेद्याला करा हे खीरीचे दोन प्रकार

छत्रपती संभाजीनगर मध्ये भावांनी केली बहिणीची कुऱ्हाडीने हत्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss