spot_img
spot_img

Latest Posts

गणेश चतुर्थी संधर्भात जाणून घ्या काही पौराणिक कथा

राज्यभरात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात केले जाते. आता अवघ्या काही दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे.

Ganeshotsav 2023 :- राज्यभरात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या उत्साहात केले जाते. आता अवघ्या काही दिवसात बाप्पाचे आगमन होणार आहे. असं म्हणतात, जिथे बाप्पाचा वास असतो, तिथे प्रत्येक क्षणी सुख-समृद्धी असते. गपती आगमनानंतर दहा दिवस गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते. गणपतीची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक भावना आहे. यंदाचीही गणेश चतुर्थी भाविकांसाठी खूप खास असणार आहे. चला तर जाणून घेऊया बाप्पाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त तसेच पौराणिक महत्त्व…

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशउत्सव साजरा केला जातो. १० दिवस असणाऱ्या गणेश चतुर्थीला खूप महत्व आहे. यंदा पंचांगानुसार गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून ते २८ सप्टेंबर २०२३ पर्यंत असेल. यावेळी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी १८ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२. ३९ वाजता सुरू होईल, मात्र तिचा उदय १९ सप्टेंबर रोजी होईल. तर २८ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश विसर्जन केले जाईल. पौराणिक कथेनुसार भगवान गणेशचा यांचा जन्म भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला स्वाती नक्षत्र आणि सिंह राशीत मध्यान्न काळात असे मानले जाते. हिंदू धर्मात गणपती उत्सवाला खूप महत्व दिले गेले आहे. श्रीगणेशाचा संबंध ज्ञान, बुद्धी यांच्याशी आहे. विघ्ननाशक, शुभ, यश आणि समृद्धी देणाऱ्या बाप्पाची मनापासून पूजा-अर्चना केली जाते. घरात आणि दुकानात योग्य पद्धतीने पूजा करून गणपतीच्या मूर्तीची स्थापना केल्यास घरात सुख-समृद्धी कायम राहते.

गणेश चतुर्थी संबंधित एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे. शिवपुराणानुसार पार्वतीने हवलेल्या अंगाला लावलेल्या हळदीच्या लेपाने एक सुंदर मूर्ती बनवली. त्यानंतर त्यात प्राण फुंकले. अशाप्रकारे बाळगणेशचा जन्म झाला. त्यानंतर माता पार्वती अंघोळीसाठी आत जात असताना तिने बाळगणेशला सांगितले कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगितले आणि पहारा देण्यास सांगितलं. त्यानंतर तिकडे भगवान शंकर गेले. गणेशाने शंकरांना ओळखले नाही. आईची आज्ञा असल्यामुळे गणेशाने शंकराला आतमध्ये जाऊन दिले नाही. त्यानंतर शंकराने क्रोधित होऊन गणेशाचे डोके त्रिशूलाने धडा वेगळे केले. बाहेर गोंधळ झाल्याचे समजताच पार्वती देवी लगेच बाहेर आल्या आणि आक्रोश करू लागल्या. त्यांनी गणेशला पुन्हा जिवंत करण्यासाठी सांगितले. तेव्हा भगवान शंकराने गरुडाला उत्तर दिशेला जाण्याची आज्ञा दिली आणि सांगितले की, जी आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली आहे, तिच्या बाळाचे डोके आणा. तेव्हा गरुडाने हत्तीच्या बाळाचे डोके आणले. भगवान शिवांनी ते मुलाच्या शरीराला जोडले. त्यात त्यांनी प्राण फुंकले. अशा प्रकारे गणेशाला हत्तीचे शीर मिळाले.

Latest Posts

Don't Miss