Thursday, May 9, 2024

Latest Posts

लालबागच्या राजाच्या चरणी रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने दानपेटीत अर्पण

लालबागच्या राजाला चरण स्पर्श करता यावा, मुख दर्शन व्हावं यासाठी अनेक तास भाविक रांगेत उभे राहतायत. काल मंगळवारी पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाखाहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं.

मुंबईसह महाराष्ट्रात कालपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्यादिवसापासून गणेशोत्सवाचा प्रचंड उत्साह भाविकांमध्ये दिसून येतोय. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पांची मनोभावे पूजा सुरु आहे. आज गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आहे. दीड दीवसाच्या बाप्पाच आज विसर्जन होईल. मुंबईत सार्वजनिक मंडळातील मोठ्या गणेश मुर्ती आणि देखावे चर्चेचा विषय असतो. मुंबईत लालबाग नगरीत स्थापन होणाऱ्या लालबागच्या राजाची देशभरात चर्चा असते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात देशभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी उसळली आहे. भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

लालबागच्या राजाला चरण स्पर्श करता यावा, मुख दर्शन व्हावं यासाठी अनेक तास भाविक रांगेत उभे राहतायत. काल मंगळवारी पहिल्याच दिवशी तब्बल 25 लाखाहून अधिक भाविकांनी लालबागच्या राजाच दर्शन घेतलं. दिवसाचे २४ तास करीरोड, चिंचपोकळी आणि लोअर परेल रेल्वे स्थानक गर्दीने फुललेलं आहे. या तिन्ही रेल्वे स्थानकापासून लालबागच्या राजाचा मंडप काही मिनिट अंतरावर आहे. त्यामुळे दूर अंतरावरुन ट्रेनने भाविक लालबाग नगरीत येत आहेत. लालबागमध्ये मुंबईचा राजा गणेशगल्ली, तेजुकाय, चिंचपोकळीचा चिंतामणी हे गणपती सुद्धा प्रसिद्ध आहेत.

लालबागच्या राजाच्या मंडपात ठेवण्यात आलेली दानपेटी आज उघडण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी भरभरुन लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलं आहे. रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने या दानपेटीत आहेत. नोटांच्या माळा यामध्ये आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आलेली रक्कम मोजणार आहेत. हे दागिने किंवा रक्कम किती आहे? ते मोजदाद झाल्यानंतरच समजेल.

हे ही वाचा: 

Disha Patani ने केली हटके ड्रेसिंग , पण पुन्हा होतेय जोरदार ट्रोल

‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss