Wednesday, May 1, 2024

Latest Posts

‘अशा’ पद्धतीने बनवा शिमला मिरची मसाला

शिमला मिरचीचा वापर सॅलड बनवण्यासाठी करतात. आरोग्यासाठी  शिमला मिरची खूप चांगली असते. शिमला मिरचीची भाजी  बेसन, दही टाकून तसेच इतर काही जिन्नस टाकून बनवली जाते. पनीरच्या भाजीत पण आवडीने शिमला मिरचीचा समावेश केला जातो. राजस्थानमध्ये शिमला मिरचीचा जास्त वापर केला जातो. पण कधी शिमला मिरची मसाला बनवली आहे का? चला तर जाणून घेऊयात या भाजीची रेसिपी.

साहित्य

१. तेल

२. मोहरी, जिरे, हिंग

३. बारीक चिरलेला कांदा

४. कढीपत्ता

५. आले लसूण पेस्ट

६. गोडा मसाला

७. हळद पावडर

८. लाल तिखट

९. बारीक चिरलेली शिमला मिरची

१०. मीठ

११. शेंगदाण्याचा कूट 

कृती

सर्वप्रथम शिमला मिरची धुऊन घ्या. नंतर मिरचीला मध्यभागी चारीबाजूने कापून घ्या. गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये थोडे तेल टाका आणि शिमला मिरची चांगली तळून घ्या. तळून एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवा. त्याच कढईमध्ये थोडं तेल टाका. जिरे, मोहरी, हिंगची फोडणी द्या. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कडीपत्ता टाका. सोनेरी रंग येईपर्यंत एकत्र करून घ्या. नंतर तयार केलेला गोड मसाला, हळद, लाल तिखट टाका. मसाल्यांना चांगला रंग येईपर्यंत दोन मिनिटे परतून घ्या. त्यामध्ये तळलेली शिमला मिरची आणि मीठ टाकून सर्व एकत्र करून घ्या. झाकण ठेवून मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा. मध्यंतराने झाकण काढून परतून घ्या. जेणेकरून कढईला मसाला चिकटणार  नाही. जर भाजी कोरडी वाटत असेल तर त्यामध्ये थोडं शिंपडू शकता. भाजीवर शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स करून घ्या. आणखी २ मिनिटे भाजी चांगली  शिजवून घ्या. तयार आहे गरमागरम शिमला मिरची मसाला. तुम्ही ही भाजी चपाती, रोटी, भाकरीसोबत खाऊ करू शकता.

हे ही वाचा:

गुढीपाडवा मेळाव्यानंतर MNS आमदाराची पोस्ट, ऊँची छलांग लगाने के लिये…

बॉलीवूड अभिनेत्री रेखाचे ग्लॅमरस फोटो पुन्हा एकदा चर्चेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss