Saturday, April 27, 2024

Latest Posts

घरच्या घरीच बनवा कुरकुरीत फणसांच्या गऱ्यांचे चिप्स

उन्हाळा म्हंटल की आंबे, फणस लगेच डोळ्यासमोर येतात.

उन्हाळा म्हंटल की आंबे, फणस लगेच डोळ्यासमोर येतात. आपण आवडीने फणसांचे गरे खातो. पण कधी तुम्ही फणसांच्या गऱ्याचे चिप्स खालेत का ? फणस हा उन्हाळ्यातच धरतो.फणस म्हंटल की लगेच डोळ्यासमोर पिवळे गरे येतात .फणसाची भाजी, फणसाचे गरे खूप छान लागतात. म्हणूनच आज तुम्हाला आम्ही फणसांच्या गऱ्यांचे चिप्स कसे बनवायचे ते सांगणार आहोत. हे चिप्स तुम्ही प्रवासाला घेऊन जाऊ शकता किंवा असेच टीव्ही बगताना खाऊ शकता.

साहित्य:-

१. कच्या फणसांच्या गरे
२. हळद
३. मीठ
४. लिंबाचा रस

कृती:-

सर्वप्रथम फणसांच्या गऱ्यांचे बारीक तुकडे करून घ्या. आणि बारीक तुकडे केल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. ते तेल हलके गरम झाल्यावरती त्या तेलमध्ये फणसांचे गरे टाका आणि एका वाटीमध्ये लिंबाचा रस, मीठ, हळद एक मिश्रण तयार करून घ्या.फणसांचे गरे ताळतानाच त्यामध्ये ते मिश्रण थोडे थोडे ओता. फणसांच्या गऱ्यांना लाल रंग येईपर्यंत तळून घ्या. तळून झाल्यावरती एका ताटात काढून ठेवा. तयार आहेत गरमा-गरम कुरकुरीत असे फणसांच्या गऱ्यांचे चिप्स.

हे ही वाचा:

होळीनिमित्त देशभरातील बाजारपेठेत चिनी वस्तूंवर बहिष्कार | Holi

७ मे ला कोकणात रंगणार भारत – पाकिस्तान, राणेंच्या उमेदवारीची अनेक समीकरणं ठाकरेंना फायद्याची

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss