Thursday, May 2, 2024

Latest Posts

‘असे बनवा’ आंबट, तिखट, गोड टोमॅटोच सार

टोमॅटो म्हंटलं की तोंडाला पाणी सुटत. कोकणात हे सार आवडीने सकाळच्या किंवा संध्यकाळच्या जेवणात भातासोबत बनवला जातो. टोमॅटोचा वापर हा रोजच्या जेवणात करतो. भाजीसाठी, डाळीसाठी, सलाड इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी करतो. रोजरोज आमटी, डाळ खाऊन कंटाळा येतो. काही तरी भातासोबत चटपटीत आंबट गोड असं काही तरी खावेसे वाटते.अश्यावेळी तुम्ही झटपट भातासोबत टोमॅटोच सार बनवू शकत. चला तर जाणून घेऊयात टोमॅटोच्या साराची रेसिपी!

साहित्य

१. मोठे टॉमॅटो २. ओलं खोबर ३. धने, जिरे, मोहरी, त्रिफळा ४. लसुन पाकळ्या ५ बेडगी मिरची ६. कांदा ७. तेल ८.कढीपत्त्याची पाने, कोथिंबीर ९. चिमुटभर हिंग १० गरम मसाला ११ गुळ १२ हळद १३ तिखट १४ चवीनुसार मीठ

कृती

सर्वप्रथम टोमॅटो चांगले स्वच्छ करून घ्या. चांगले धुऊन कुकरमध्ये टाकून २ शिट्या करून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबर, कांदा,जिरे, बेडगी मिरची, लसुन पाकळ्या, त्रिफळा टाकून छान वाटण करून घ्या. त्रिफळा टाकल्यावर साराच सुगंध खूप छान येतो. त्यानंतर उकडलेल्या टोमॅटोचे सालन काढून घ्या. साल काढून झाल्यावर टोमॅटोची बारीक प्युरी करून घ्या. फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवा. त्यामध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्त्याची पाने, टाकून फोडणी द्या. त्यामध्ये थोडे हिंग टाका. नंतर तयार केले खोबरायच वाटण टाक. वाटण छान शिजवून त्यामध्ये तयार केले टोमॅटोंची प्युरी टाका. गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडं गुळाचा वापर करावा. सर्व जिन्नस टाकल्यानंतर ५ मिनिटे मंद आचेवर चांगले उकळी काढून घ्या. कोथिंबीर टाकून तयार आहे आंबट, तिखट, गोड टोमॅटोच सार. तुम्ही हे सार भातसोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

 
 
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss