Monday, November 13, 2023

Latest Posts

आजचे राशिभविष्य, ३ नोव्हेंबर २०२३, शुक्रवार, आत्मविश्वास आणि उत्साह…

अनुकूल ग्रहमानाचा आनंद घ्या.

माझी रास

मेष :- अनुकूल ग्रहमानाचा आनंद घ्या. प्रतिष्ठा वाढेल. उत्तम आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल.

वृषभ:- अनुकूल दिवस आहे. सुखद अनुभव येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवास घडतील.

मिथुन:- आत्मविश्वास आणि उत्साह यांचा अनुभव येईल. येणाऱ्या काळासाठी तुम्ही तयार असणार आहे.

कर्क:- फारसा चांगला दिवस नाही. तरीही अनेक सुखद घटना घडतील. काळजी पूर्वक काम केल्यास आनंद मिळेल.

सिंह:- अजून एक आनंद देणारा अनुकूल दिवस आहे. मंगळ, बुध, शुक्र, हर्षल यांशी चंद्राचा शुभ योग आहे. नवीन खरेदी होईल.

कन्या:- कामाचा वेग वाढेल. नवीन भरघोस व्यवसाय येणार आहे. त्यासाठी तयार राहा.

तुळ:- जुने मित्र भेटतील. नात्यातून लाभ होतील. ज्येष्ठ व्यक्तीकडून लाभ होतील. पर्यटन घडेल.

वृश्चिक:- प्रतिकूल दिवस आहे. अपमानाचे प्रसंग येऊ शकतात. सरकारी कामात चालढकल नको. काळजी घ्या.

धनु:- हरवलेली वस्तू सापडेल. सौख्य लाभेल. ज्याची वाट बघत होतात, ती घटना घडेल. शांतता लाभेल.

मकर:- व्यवसाय आणि नाते बळकट करणारा दिवस आहे. जुन्या मित्रांकडून लाभ होतील. राजकीय यश मिळेल.

कुंभ:- शेअर्समधून उत्तम यश लाभेल. जुनी गुंतवणूक कामास येईल. संततीकडून खुश खबर मिळेल.

मीन:- नवीन खरेदीचे योग आहेत. राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. स्थलांतर घडेल.

हे ही वाचा : 

फुलंब्रीकर कुटुंब  कसं आहे,हे जाणून घ्यायचंय तर  या कुटुंबाला एकदा येऊन तर भेटा!

शाहरुखच्या ‘डंकी’ मध्ये झळकल्या ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss