Wednesday, May 8, 2024

Latest Posts

जेवणापूर्वी गोड पदार्थ खाण्याचे हे आहेत फायदे; जाणून घ्या एका क्लिकवर

बहुतांश जणांना गोड पदार्थ खाण्यास खूप आवडतात. मिठाई, गुलाबजाम, शिरा, खीर अश्या अनेक गोड पदार्थांवर आपण ताव मारतो. पण अतिगोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. आपल्या भारतीय पद्धतीनुसार आपल्याकडे खाण्या पिण्याशी निगडित काही नियम आहेत.

बहुतांश जणांना गोड पदार्थ खाण्यास खूप आवडतात. मिठाई, गुलाबजाम, शिरा, खीर अश्या अनेक गोड पदार्थांवर आपण ताव मारतो. पण अतिगोड पदार्थ आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. आपल्या भारतीय पद्धतीनुसार आपल्याकडे खाण्या पिण्याशी निगडित काही नियम आहेत. आपल्याकडे दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण करण्यासाठी काही ठराविक वेळ ठरलेली असते. या नियमांचे पालन केल्याने आपले शरीर निरोगी राहते. त्याचबरोबर गोड पदार्थ खाण्याबद्दलही असा एक नियम सांगितला आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो नियम माहित नाही आणि म्हणूनच तो नियम आपल्याकडून पाळला जात नाही. अनेकजण जेवणानंतर गोड पदार्थ खातात. हॉटेल मध्ये गेल्यावरही जेवण झाल्यानंतर डेजर्ट (dessert) म्हणून गोड पदार्थ खातात. पण जेवणानंतर गोड पदार्थ खाणे हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ ही जेवणाआधीची सांगितली आहे.

आयुर्वेदाप्रमाणे गोड पदार्थ जसे कि मिठाई, शिरा, हे जेवणाआधी खावे असे सांगितले जाते. बहुतेक लोक हे जेवणानंतर गोड पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. पण ते चुकीचे आहे. त्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. गोड पदार्थ हे पचण्यास जड असतात. पचायला जड असल्यामुळेच जेवणाआधी गोड पदार्थ खाल्याने आपल्या शरीरातील पाचक स्रावांचा प्रवाह वाढतो. तुम्ही जर जेवणाआधी गोड पदार्थाचे सेवन केल्याने तुमचे टेस्टबड्स ऍक्टिव्ह (Testbuds Active) होतात आणि त्यामुळेच तुम्ही जेवणाचे दोन घास जास्तच खाऊ शकाल.

आपल्याकडे अनेक लोक जेवणानंतर गोड पदार्थ खातात पण ही पद्धत आपल्या आरोग्यासाठी चांगली नाही. याचा आपल्या पचनक्रियेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. जेवणानंतर गोड पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या पचनक्रियेवर मोठा परिणाम होऊन आपली पचनक्रिया मंदावू शकते. जेवणानंतर गोड पदार्थ खाल्याने पोटाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच गोड पदार्थाचे सेवन जेवणा आधी केल्याने आपले पोट फुगु शकते व आपल्या पोटात गॅस तयार होऊन आपल्याला त्रास होऊ शकतो. आपल्याला अपचनाच्या समस्यांनाही तोंड दयावे लागते. त्यामुळे जेवणानंतर गोड पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

हे ही वाचा:

जाणून घ्या आयपीएल २०२३ नंतर टीम इंडियाचे वेळापत्रक

बारावी नंतर टीव्हीवर झळकण्याची इच्छा? हा कोर्स ठरेल उत्तम पर्याय

घरच्या घरी बनवा पनीरचा हा चमचमीत पदार्थ…. जाणून घ्या संपूर्ण रेसिपी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss