Wednesday, May 1, 2024

Latest Posts

जाणून घ्या ‘टूथपेस्टच्या’ शोधामागची रंजक कहाणी

दुसरीकडे ग्रीक आणि रोमन लोक टूथपेस्ट तयार करण्यासाठी ठेचलेली हाडे आणि शिपल्यांचे कवच वापरत.

टूथपेस्ट हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याच एक अविभाज्य भाग आहे. सकाळी टूथपेस्टने स्वच्छ दात घसल्याशिवाय अनेकाच्या दिवसाची सुरुवात होत नाही. पण तुम्हाला माहितीये का या टूथपेस्टचा देखील एक इतिहास आहे आणि आज तोच इतिहास आपण जाणून घेणार आहोत.

५००० वर्षांपूर्वी पासून दात स्वच्छ करण्यासाठी विविध घटकांपासून बनविलेले पदार्थ वापरणारे इजिप्शियन हे पहिले लोक मानले जातात. तर ३५०० ईसापूर्व काळापासून प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांमध्ये टूथपेस्ट वापरली जायची, तर भारत आणि चीनमधील लोकांनी ५०० वर्षाच्या आसपास टूथपेस्ट वापरण्यास सुरुवात केली.

असे आढळून आले आहे की इजिप्शियन लोक जळलेल्या अंड्याचे कवच, बैलाच्या खुरांची पावडर आणि राख यांचा वापर करून, प्युमिस स्टोन वापरून पावडर बनवायचे आणि त्याने ते दात आणि हिरड्या घासायचे.तर दुसरीकडे ग्रीक आणि रोमन लोक टूथपेस्ट तयार करण्यासाठी ठेचलेली हाडे आणि शिपल्यांचे कवच वापरत. नंतर, रोमन लोकांनी श्वासाच्या दुर्गंधीची समस्या दूर करण्यासाठी त्याच्या पद्धतीच्या टूथपेस्ट मध्ये कोळसा आणि झाडाच्या सालीचा वापर करायला सुरुवात केली.

गेल्या आधुनिक काळात टूथपेस्टचा विकास १८०० च्या दशकात सुरू झाला. सुरुवातीच्या टूथपेस्ट मध्ये साबण होता आणि १८५० मध्ये टूथपेस्टमध्ये खडूचा समावेश केला गेला.१८०० च्या दशकात इंग्लंडमध्ये टूथपेस्टमध्ये सुपारीचा समावेश करण्यात आला होता आणि 1860 च्या दशकात तयार करण्यात आलेल्या घरगुती टूथपेस्टमध्ये नैसर्गिक कोळशाचा वापर केला गेला होता.

१८५० च्या आधी, ‘टूथपेस्ट’ ही सहसा पावडर स्वरूपात उपलब्ध होती. १८५० च्या दशकात, क्रिम डेंटिफ्रिस नावाच्या जारमधील नवीन टूथपेस्ट विकसित करण्यात आली आणि १८७३ मध्ये कोलगेटने जारमध्ये टूथपेस्टचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले. कोलगेटने 1890 च्या दशकात ट्यूबमध्ये टूथपेस्ट विकायला सुरुवात केली.

१९४५ नंतर टूथपेस्टमध्ये साबणाचा समवेश असायचा. त्या काळानंतर, टूथपेस्टची गुळगुळीत पेस्ट किंवा इमल्शन बनवण्यासाठी साबणाची जागा इतर घटकांनी घेतली – जसे की सोडियम लॉरील सल्फेट, हा सध्याच्या टूथपेस्टमध्ये एक सामान्य घटक आहे.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दातांची संवेदनशीलता यासारख्या विशिष्ट रोग आणि परिस्थिती टाळण्यासाठी किंवा उपचार करण्यासाठी आधुनिक टूथपेस्ट विकसित करण्यात आली. दातांचे विविध विकार टाळण्यासाठी फ्लोराईड टूथपेस्ट १९१४ मध्ये तयार करण्यात आल्या.

आज टूथपेस्टमध्ये सामान्यत: फ्लोराईड, कलरिंग, फ्लेवरिंग, स्वीटनर, तसेच टूथपेस्टला गुळगुळीत पेस्ट, फोम बनवणारे आणि टूथपेस्ट ओलसर ठेवणारे घटक असतात. ट्यूबमधील टूथपेस्टचा वापर जगभरात केला जातो आणि हा टूथपेस्टच्या विश्वातील एक अतिशय यशस्वी शोध आहे.

हे ही वाचा:

उद्या राज्यभर सामूहिक “राष्ट्रगीत गायन”

Latest Posts

Don't Miss