Thursday, May 2, 2024

Latest Posts

तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं का निर्माण होतात ?

सध्या महिलांना, मुलींना तसेच पुरुषांना देखील अनेक समस्या उदभवत असतात. त्यामध्ये त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात.

सध्या महिलांना, मुलींना तसेच पुरुषांना देखील अनेक समस्या उदभवत असतात. त्यामध्ये त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच डोळ्यांखाली वर्तुळे येण्यासारखी देखील समस्या उद्भवते. आजकाल ही खूपच कॉमन समस्या आहे. आपण याची कारणं आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत. तुमच्या डोळ्यांखाली काळे डाग अर्थात डार्क सर्कल्स दिसतात का? आजकाल ही खूपच कॉमन समस्या आहे. आजच्या काळात व्यस्त जीवनशैली, झोपेचा अभाव, मोबाईल आणि लॅपटॉपवर जास्त काम करणे आणि बराच वेळ टीव्ही पाहणे यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. डोळ्यांखाली असलेली काळी वर्तुळे चेहऱ्याचं सौंदर्य खराब करतात. यामुळे आपण आजारी असल्यासारखे दिसतो.

काळी वर्तुळं नक्की का निर्माण होतात?

अनुवंशिक – काही जणांच्या बाबतीत डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे ही अनुवंशिक असतात. त्यावर बऱ्याचदा काहीही उपचार केले तरीही ते डाग तसेच राहतात.

सूर्यकिरण – सूर्यकिरण हे चेहऱ्यावर डाग येण्याचं मुख्य कारण आहे. त्वचेतील मेलॅनीनचं प्रमाण सूर्यकिरणांमुळे वाढतं. जेव्हा आपली त्वचा सतत सूर्यकिरणांच्या संपर्कात येते तेव्हा हे मेलॅनीन कमी अधिक प्रमाणात वाढतं आणि काळे डाग वाढतात.

तणाव – आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात प्रचंड तणाव येतो. तसंच झोपही पूर्ण होत नसते. त्यामुळे तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं जमा होऊ लागतात.

वाढतं वय – वाढत्या वयात त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामध्येच डोळ्यांखाली वर्तुळे येण्यासारखीदेखील समस्या उद्भवते. वयाच्या चाळीशीनंतर साधारण त्वचेची पुनर्निर्मितीची क्षमता कमी होते. त्यामुळे काळी वर्तुळे अधिक वाढतात.

प्रदूषण – प्रदूषणामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्रांमध्ये धूळ जमा होते आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली डाग निर्माण होण्यात होतो.

या सर्व कारणांमुळे तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे ही येतात.

हे ही वाचा : 

Beetroot च्या सालीने बनवा हेअर मास्क, केसांशी संबंधित समस्या…

Dr. Babasaheb Ambedkar जयंतीनिम्मित द्या मराठीत खास शुभेच्छा!

BAISAKHI निम्मित द्या हटके शुभेच्छा!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss