Saturday, June 3, 2023

Latest Posts

Sachin Tendulkar याच्या फोटोचा आणि नावाचा ‘बनावट जाहिराती’मध्ये गैरवापर

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन थेट पोलीस ठाण्यात पोहचला आहे. सचिनने मुंबई क्राइम ब्रँचच्या सायबर सेलमध्ये पोलीस तक्रार दाखल केली आहे. ऑनलाइन ग्राहकांची दिशाभूल करण्यासाठी त्याचे नाव, आवाज आणि फोटो बनावट जाहिरातींसाठी वापरला जात असल्याचा आरोप केला आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने अज्ञात लोकांविरुद्ध कलम ४२६, ४६५ आणि ५०० अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 तसेच आज सचिन तेंडुलकर यांच्या सोबतच जो प्रकार उघडकीस आला तसाच काहीश्या तक्रारींना भारतातील आणि जगभरातील सेलिब्रिटींना सामोरे जावे लागले आहे. जेथे त्यांच्या प्रतिमा किंवा आवाजाचा वापर इंटरनेटवर लोकांची फसवणूक करण्यासाठी व्यावसायिक हेतूंसाठी केला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सचिन तेंडुलकरच्या स्वीय सहाय्यकाला फेसबुक वर एका तेल कंपनीची जाहिरात सापडली, ज्यामध्ये तेंडुलकरचे चित्र त्याच्या जाहिरातीसाठी वापरले गेले होते. ज्यात या उत्पादनाची शिफारस अनुभवी खेळाडूने केली होती आणि तत्सम जाहिराती इंस्टाग्रामवर देखील आढळल्या होत्या. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांखाली फसवणूक आणि बनावटगिरी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

तसेच ही काही पहिली वेळ नाही जेव्हा कोणीतरी सचिन तेंडुलकरच्या फोटोचा किंवा उत्पादनांच्या जाहिरातीसाठी आवाजाचा गैरवापर करून ऑनलाइन लोकांना फसवते. यापूर्वी देखील २०२० मध्ये, तेंडुलकरच्या टीमने एक निवेदन जारी केले होते. ज्यामध्ये ते त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, फोटो व्यावसायिक हेतूंसाठी वापरणाऱ्या कंपन्या आणि व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करतील असे म्हटले होते. त्यानंतर, तेंडुलकरने गोव्यातील एका कॅसिनोविरुद्ध प्रचार सामग्रीमध्ये मॉर्फ केलेला फोटो वापरल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

Latest Posts

Don't Miss