Tuesday, April 30, 2024

Latest Posts

Baramati येथे दाम्पत्याची भरदिवसा हत्या, शहरात खळबळ

बारामती शहरामध्ये दाम्पत्याचा खून झाल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील जामदार रोडवरील सोसायटीत या पती पत्नीची हत्या करण्यात आलेली आहे. हि हत्या कोणत्या कारणामुळे झाली तसेच या हत्येमागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस करत असून बारामती शहर सुरक्षित आहे कि नाही? असा सवाल नागरिकांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण शहरात वाढले असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सचिन महालिंग वाघोलीकर व सारिका सचिन वाघोलीकर हे मृत दाम्पत्याचे नाव आहे. दोघांच्याही अंगावर वार केलेले असून त्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात स्वयंपाक घरात आढळून आले. मिळालेल्या माहिती नुसार मयत सचिन यांचे मित्र त्यांना भेटण्यासाठी त्याच्या राहत्या घरी सकाळी ११ च्या सुमारास आले होते. त्यानंतर त्यांना झाल्या प्रकाराबद्दल माहिती मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस लगेच श्वान पथक आणि तज्ज्ञांना घेऊन घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड व पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी घटनास्थळी दाखवलं होऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

मृत दाम्पत्यास दोन मुले व एक मुलगी आहे. मुले कन्हेरी येथे मारुतीच्या दर्शनास गेलेली होती. बेडरूम मधील कपाट व खोलीमधील डबे अस्ताव्यस्त पडलेले आढळल्यामुळे चोरीच्या उद्देश्याने हा खून केला असू शकतो अस पोलीस सांगतात. तरीही हा खून नक्की चोरीच्या उद्देश्याने केला कि घातपात झाला या चर्चांना एकाच वेग मिळाला आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss