Saturday, April 27, 2024

Latest Posts

ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या…Praniti Shinde आणि Ram Satpute आमने-सामने

लोकसभा निवडणुकांच्या जागा आणि उमेदवार जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरणात वार-पलटवार होतांना पाहायला मिळत आहे. कॉंग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यांनतर त्यांच्याविरोधात आता सोलापूरमधून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच अनुषंगाने, प्रणिती शिंदे यांनी सोशल माध्यमाच्या मदतीने व्यक्त होत, राम सातपुते यांचे सोलापूरच्या लोकसभा निवडणूक रिंगणात स्वागत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटवर राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? 

आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहु‌भाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते. तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते, असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे. पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते. अशा शब्दांत प्रणिती सुशीलकुमार शिंदे व्यक्त झाल्या आहेत.

काय म्हणाले राम सातपुते? 

मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय. मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय. राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगीण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. वंदे मातरम्! असे ट्वीट राम सातपुते यांनी केले आहे.

हे ही वाचा:

आंबेडकरांनी आमच्यासोबत असावं कारण…काय म्हणाले Sanjay Raut?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंग भगवा – Dr. Shrikant Shinde

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss