Tuesday, May 7, 2024

Latest Posts

AJIT PAWAR यांनी मुख्यमंत्री व्हावे, मातोश्रींची इच्छा

सध्या सगळीकडे निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आज ठिकठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या जाणार आहेत. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. बारामतीतील काटेवाडीत मतदानाला सुरुवात झाली आहे. याच काटेवाडीत अजित पवार यांच्या कुटुंबियांचे मतदान होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा आशा पवार यांनी व्यक्त केली. माझ्या डोळ्यातदेखत मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं देखील त्या म्हणाल्या. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.

मी १९५७ पासून काटेवाडीत मतदान करते आहे. पूर्वीच्या काटेवाडीत आणि आत्ताच्या काटेवाडीत भरपूर बदल झाले आहेत. अनेकांनी यासाठी हातभार लावला आहे. राज्यातील अनेकांना अजित पवार मुख्यमंत्री व्हावा, असं वाटतं. तसंच आई म्हणून माझ्या देखत मुलानं मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं. माझं वय आता ८४ वर्ष झालं आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे मलाही अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं बघायला आवडेल, अशी इच्छा अजित पवार यांच्या आई अशा पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा : 

कायद्य्याच्या पलीकडचं मागणाऱ्या मनोज जरांगे हाती सरकारी GR; भाषा बदलली दिशा बदलणार?

तुम्हाला मिळणाऱ्या Diwali Bonus ची सुरुवात नेमकी कशी झाली? Diwali 2023

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss