Sunday, April 28, 2024

Latest Posts

आपल्या सहकाऱ्यांना सांगा, “नट” म्हणून हिनवणे..Amol Kolhe यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

२८ मार्च रोजी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते व माजी खासदार गोविंदा आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून १४ वर्षांनी पुन्हा राजकारणात नवी इनिंग सुरू करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कलाकार हा कलाकार असतो. त्याचा अपमान म्हणजे संपूर्ण सिनेसृष्टीचा अपमान असतो. त्यामुळे कलाकारांना मान दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे म्हणाले, त्याचा व्हिडीओ पोस्ट करत अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत “नट” म्हणून हिणवतात. पण तुम्ही व्यक्त केलेल्या भावना योग्य असल्याचे अमोल कोल्हे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

आपल्या भावना अतिशय स्तुत्य आहेत. कलाकार हा आपल्या कलेने समाजाला प्रबोधन करणारा, समाजाला आरसा दाखवणारा “माणूस” असतो. परंतु, आमच्या भागातील पूर्वी आपल्याच पक्षात असलेले व सध्या आपण दुसऱ्या पक्षाला उसने दिलेले एक गृहस्थ मला सतत “नट” म्हणून हिणवतात. माझ्या कलेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत शिवशंभू विचार प्रत्येकाच्या मनात रुजविण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला. केवळ आकस म्हणून मला “नट” म्हणून हिनवणे योग्य नाही हे कृपया आपण आपल्या सहकाऱ्यांनाही सांगावे!

गोरेगाव चित्रनगरी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रनगरी व्हावी

शिवसेनेचे कार्य, मुंबईत सुरू असलेली विकासकामे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षात देशाचा झालेला सर्वांगीण विकास पाहून शिवसेनेमध्ये सक्रिय होण्याचा निर्णय घेतला असल्याचे अभिनेता गोविंदा अहुजा यांनी प्रवेशावेळी सांगितले. गोरेगाव चित्रनगरी जगातील सर्वोत्कृष्ट चित्रनगरी व्हावी, यासाठी भविष्यात विशेष प्रयत्न करण्याची इच्छा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. अभिनेता गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश करताना आपल्याला कोणत्याही पदाची अथवा तिकिटाची अपेक्षा नसल्याचे सांगितले. मात्र, त्यांची लोकप्रियता पाहता त्यांची पक्षाच्या लोकसभा प्रचारात ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती करत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. तसेच खासदार म्हणून त्यांना असलेल्या प्रशासकीय अनुभवाचा पक्षाला पुढील वाटचालीत नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा:

पवारसाहेब देतील तो उमेदवार ‘खासदार’ होणारच, काय आहे Kiran Mane यांची पोस्ट?

सर्वसामान्य माणूस या घाणेरड्या  राजकारणामुळे…Imtiyaz Jaleel काय म्हणाले?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss