Wednesday, May 1, 2024

Latest Posts

खासदाराने कसे काम करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे Dr. Shrikant Shinde

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske)यांनी माध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. लोकसभेतील खासदाराने कसे काम करावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्रीकांत शिंदे असे मत नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. खासदार श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेमध्ये चांगले काम करत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी कामाचा डोंगर त्या ठिकाणी उभा केला आहे. लोकसभेतील खासदाराने कसे काम करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आहेत. श्रीकांत शिंदे यांना लोकांचा पाठिंबा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो, असे म्हणत नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी श्रीकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचा श्रीकांत शिंदे यांना विरोध नाही. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी मी व रविंद्र चव्हाण विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये मेळावे घेत आहोत, असे मत शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले. 

श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण म्हणाले की, श्रीकांत शिंदे हे एनडीएचे उमेदवार आहेत. दोन महिन्यापूर्वीच आम्ही सर्वांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाला सुरुवात केली होती. खासदार श्रीकांत शिंदे विक्रमी मतांनी जिंकून येतील. कल्याण लोकसभा मतदारसंघातून आम्ही कामाला लागलो आहोत. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील आनंद व्यक्त होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून वाद होते. या जागेवर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी हक्क सांगितला होता. त्यामुळे, महायुतीकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नव्हती. परंतु, आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

हे ही वाचा:

Sanagli वरून MVAत वाद कायम, त्यात Sanjay Raut यांनी घेतली माजी BJP आमदारांची भेट..

ठाणे लोकसभा शिंदेंकडे, संजीव नाईकांच्या हाती धनुष्यबाण ? भावी मंत्रिपदासाठी सरनाईकांचे आस्तेकदम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss