Monday, November 20, 2023

Latest Posts

CRIME: सायबर चोराकडून डॉक्टरांची फसवणूक

नवी मुंबईतील एका महिलेला ऑनलाईन लिपस्टिक विकत घेणं महाग पडलं आहे. फक्त ३०० रुपयांच्या लिपस्टिकमुळे त्या महिलेचे तब्बल १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सायबर चोराकडून त्या महिलेच्या खात्यामधून लाखो रुपये उडवण्यात आले आहेत. यामुळे त्या डॉक्टरचे आर्थिक नुकसान झाले आणि त्या महिलेला प्रचंड मनस्तापाला सामोरे लागले. नवी मुंबईत राहणाऱ्या या डॉक्टरने २ नोव्हेंबर रोजी एका ई-कॉमर्स पोर्टलवर लिपस्टिकची ऑर्डर दिली होती.

काही दिवसांनी त्या डॉक्टरला यासंदर्भात कुरिअर कंपनीकडून एक मेसेज आला आणि तुमच्या लिपस्टीकची डिलीव्हरी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्या महिलेला लिपस्टीक काही मिळाली नव्हती, त्यामुळे याबद्दल विचारण्यासाठी तिने कुरिअर कंपनीच्या नंबरवर संपर्क साधला. तेव्हा आमचा कस्टमर केअरचा प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधले, असे तिला सांगण्यात आले. त्यानंतर त्या डॉक्टरच्या मोबाईवर एक कॉल आला आणि फोनवरील दुसऱ्या व्यक्तीने तिला सांगितलं की, तिची ऑर्डल होल्डवर ठेवण्यात आली आहे. आणि लिपस्टीकची ऑर्डर हवी असेल, तर तुम्हाला दोन रुपये भरावे लागतील. मात्र त्या महिला डॉक्टरने पैसे भरण्यास नकार दिला.

अखेर तिला एक वेबलिंक पाठवून, त्यामध्ये बँकेचे तपशील भरण्यास सांगण्यात आले. यानंतर डॉक्टर महिलेला भीम यूपीआय (BHIM UPI) लिंक बनवण्याबाबत एक मेसेज मिळाला. तेव्हा तिने कॉल करणाऱ्यांना याबाबत तातडीने विचारले असता, आता लवकरच तुमचे पार्सल डिलीव्हर होईल, असे उत्तर तिला देण्यात आले. तिने लिंकवर क्लिक करताच तिच्या मोबाईलवर एक APP डाउनलोड झाले. त्यानंतर ९  नोव्हेंबर रोजी त्या डॉक्टरच्या बँक अकाऊंटमधून आधी ९५ हजार रुपये आणि नंतर ५ हजार रुपये डेबिट झाले. एकूण एक लाख रुपये डेबिट झाल्याचे कळताच त्या डॉक्टरला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने नेरूळच्या सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा:

कपिल देवचं तिथे आगमन झालं असतं तर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं, संजय राऊत

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss