Monday, May 6, 2024

Latest Posts

बनावट व फसव्या वेबसाईट वापरू नका – जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांना आदेश

देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ (शासनाच्या संकेतस्थळा सारखे दिसणारे) तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र अदा करून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे असे केंद्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

देशात काही ठिकाणी जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचे बनावट फसवी संकेत स्थळ (शासनाच्या संकेतस्थळा सारखे दिसणारे) तयार करून त्यावरून जन्म मृत्यू प्रमाणपत्र अदा करून सर्वसामान्य जनतेचे फसवणूक करणे सुरू आहे असे केंद्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. तसेच अनेक सार्वजनिक माध्यमातून जन्म मृत्यू प्रमाणपत्राचे वाटपाबाबत लोकांमध्ये अफवा पसरवली जात आहे. खाजगी संस्थांनी जन्म मृत्यू प्रमाणपत्र कामकाजाची इतर संकेतस्थळ तयार केली आहे. सर्व सामान्य जनतेकडून मोबदला किंवा फी वसूल करून सदर प्रमाणपत्र अदा केली जात आहेत. CRSORGIGOOVI.IN, CRSRGIIN, BIRTHDEATHONLINE.COM ह्या संकेतस्थळावरून फसवे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. नागरिकांनी या संकेतस्थळांचा वापर करू नये म्हणून आवाहनाचे सूचना फलक दर्शनी भागात लावण्याबाबत निबंधकांना कळविण्यात आले आहे. बनावट फसव्या संकेतस्थळाकडून लाभार्थींची फसवणूक होणार नाही. लाभार्थ्यांनी शासनाचे crsorgi.gov.in हे संकेतस्थळ वापरावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

जिल्हास्तरीय जन्म मृत्यू नोंदणी समिती सभा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर समितीचे सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत जन्ममृत्यू नोंदणी बाबत केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्राप्त परिपत्रक विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेतील विषय अतिशय महत्त्वाचा असून सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावलं उचलली आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

सदर समितीचे सह अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत जन्ममृत्यू नोंदणी बाबत केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्राप्त परिपत्रक विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेतील विषय अतिशय महत्त्वाचा असून सामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावलं उचलली आहेत असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.

जन्म नोंदणी हे जन्म झालेल्या दिनांका पासून १५ वर्षाच्या आत बाळाच्या नावाची नोंदणी करता येते, असे जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ चे कलम १४ व महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम २००० मधील नियम १० नुसार नमुद करण्यात आले आहे. तरी काही घटकांच्या बाबतीत वरील काल मर्यादा उलटून गेल्यावर बाळाच्या नावाची नोंदणी करण्याचे राहून जात असल्याने तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती ही मुदतवाढ दि. १४/०५/२०२० रोजी संपूष्टात आली होती. राज्यातील काही घटकांच्या बाबतीत अजूनदेखील बाळाच्या नावाची नोंद करावयाची राहिली असल्याने अखेरची मुदतवाढ दि. २७ एप्रिल २०२६ पर्यंत वाढवण्यात आले आहे अशी माहिती मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक यांनी कारागृहात जन्म झालेल्या बालक-बालिका यांचे जन्म नोंदवही मध्ये जन्मस्थान कारागृह अथवा तुरुंग असे नमूद न करता ज्या कारागृह अथवा तुरुंग जन्म झाला आहे त्या शहराचे व गावाचे नाव नमूद करावे अशा सूचनाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

हे ही वाचा : 

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना करावा लागणार अडचणींना सामना, फक्त ३७% पाणीसाठा

राज्यात कोरोनाचा धुमाकूळ वाढतोय!, रुग्णामध्ये होतेय सातत्याने वाढ

छ. संभाजीनगर पाठोपाठ आता कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान झाली दगडफेक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss