Tuesday, May 7, 2024

Latest Posts

Exclusive, आज मैदानवरची धूळ आज निघून गेली, अविनाश जाधव

दरवर्षी गुढी पाडव्याच्या (Gudipadwa) शुभमुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ ही शिवतिर्थावर जोरदार धडाडते.

दरवर्षी गुढी पाडव्याच्या (Gudipadwa) शुभमुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray) यांची तोफ ही शिवतिर्थावर जोरदार धडाडते. यंदाही त्यांची तोफ ही धडाडणार आहे. उद्या दि. २२ मार्च रोजीही राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथे सभा आहे. यामुळे मनसैनिकांना राज ठाकरे यांच्या (Raj Thackeray Gudipadwa Speech) तडाखेबाज भाषणाची प्रतीक्षा लागली आहे. तसेच या सभेपूर्वीच एक टिझर (Mns Teaser) देखील जारी करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त आज ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Thane Palghar District President Avinash Jadhav) यांनी ‘टाईम महाराष्ट्र’ (Time Maharashtra) सोबत खास बातचीत केली आहे.

उद्या दिनांक २२ मार्च रोजी राज ठाकरे यांची सभा होणार आहे. याच पार्शवभूमीवर ठाणे जिल्ह्यातून कशी तयारी करण्यात आली आहे या संदर्भात अविनाश जाधव यांच्या सोबत बातचीत केली आहे. तर यावेळी बोलत असताना अविनाश जाधव म्हणाले, आमच्या कडून या सभेसाठी जोरदार तयारी ही करण्यात आली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जवळपास २५ हजार लोक उद्या शिवतिर्थावर जाणार आहेत. सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आमच्या सर्वांसाठी हा सणासारखाच दिसू आहे असं अविनाश जाधव म्हणाले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, उद्या सभेतून साहेब (राज ठाकरे) काय बोलतात या कडे जसे सर्वांचं लक्ष लागले आहे तसेच आमच्या महाराष्ट्र सैनिकांचे देखील लक्ष लागले आहे असं अविनाश जाधव म्हणाले आहेत.

तसेच ते पुढे म्हणाले संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून जवळपास ३५० बसेस आहेत आणि १५०० कार चाकी गाड्या या जाणार आहेत. तसेच ते पुढे म्हणाले आज जो काही पाऊस पडला आहे त्याला आम्ही वरून राजाने आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे असं समजतो. मैदानावर जी काही धूळ साचली होती ती आज निघून असं म्हणत अविनाश जाधव यांनी खोचक टोला देखील लगावला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, उत्साहात उद्याचा आमचा पाडवा मेळावा हा होणार आहे. तसेच पुढील निवडणुकांसंदर्भात त्यांना प्रश्न विचारला असता अविनाश जाधव म्हणाले, आमची तयारी ही संपूर्ण स्वबळाची आहे. परंतु जो आदेश येईल त्याचे आम्ही पूर्ण पालन करू.

तसेच राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेचा नवा टिझरमध्ये मराठी, हिंदू आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे यांची मुंबईतील शिवतीर्थावर सभा होणार आहे. टिझरमध्ये हिंदू ही दोन अक्षरे जगा, मराठी या ३ अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा, राज ठाकरे या पाच अक्षरे नेहमीच पाठीशी असतील, असे म्हटले आहे.

हे ही वाचा : 

Amruta Fadnavis आणि Priyanka Chaturvedi यांच्यात ट्विटर वॉर

शेतकरी जगला तरच राज्य जगेल, राज्यातला शेतकरी हवालदिल, अजित पवार

ठाण्यातील घोडबंदर रोडचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करा, शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांची आयुक्तांकडे मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss