Wednesday, May 8, 2024

Latest Posts

THANE: खासदार श्रीकांत शिंदेंनी घेतली नागरिकांची भेट

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (MAHATMA GANDHI RASHTRIY GRAMIN ROJGAR HAMI YOJNA) ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र ग्राम रोजगार सेवक कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी आज ठाण्यातील (THANE) टेंभी नाका येथील आनंदाश्रम येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली.

ग्रामरोजगार सेवकांना किमान वेतनावर आधारित प्रतिमाह निश्चित मानधन वैयक्तिक खात्यावर देण्यात यावे, तसेच ग्रामरोजगार सेवकांना ग्रामपंचायती पासून तालुका स्तरावर जाण्या-येण्याच्या खर्च, स्टेशनरी खर्च, आणि विमा संरक्षण देण्यात यावे, तसेच मोबाईल मॉनिटरिंग सिस्टीम द्वारे हजेरी घेण्यासाठी लॅपटॉप (LAPTOP) किंवा एंड्रआईड मोबाईल (ANDROID MOBILE) आणि इंटरनेटचा (INTERNET) खर्च देण्यात यावा, यांसह विविध मागण्या आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यावेळी त्यांनी सांगितल्या, तसेच याबाबाबत त्यांनी निवेदनही दिले.

यावेळी या सर्व ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या तातडीने सोडविण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासनही खासदार श्रीकांत शिंदे यांनी नागरिकांना यावेळी दिले. या प्रसंगी शिवसेनेचे (SHIVSENA) जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे (GOPAL LANDAGE) यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.

हे ही वाचा : 

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

Maharashtra: ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss