Monday, May 6, 2024

Latest Posts

मी बजावणार मतदानाचा हक्क, पोतराजाने केली जनजागृती

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन, २५  ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालय व १४८  ठाणे विधानसभा निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आता या उपक्रमामध्ये पोतराजही सहभागी झाला असून आपल्या कलेद्वारे नागरिकांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करत आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे शहरात २५  ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. कोणताच घटक मतदानापासून वंचित नाही राहिला पाहिजे या संकल्पनेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

ठाणे शहरात मतदान जनजागृती कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे तेथे पोतराजचे आगमन झाले. त्यांनी मतदान जनजागृतीचे फलक पाहिले, घोषणा ऐकल्या. पोतराजाने स्वतःहून स्वीप पथकास म्हणाला की, आपण सर्व हे लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदान टक्का वाढण्यासाठी कार्यक्रम करत आहात. मी पण एक पोतराज आहे आणि पोतराज हा देवीची उपासना करणारा लोकसंस्कृतीचा उपासक असतो. पोटासाठी मी आसूड घेऊन नाचतो, पण मी आपल्या देशासाठी मतदान करणार, मतदान माझा अधिकार आहे. यावेळी पोतराज यांनी त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व सांगितले. पोटाचे खळगे भरण्यासाठी तो पोतराज स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके ओढत एकीकडे मतदान माझा अधिकार आहे, असे म्हणत त्याने गाण्यातून सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.

हे ही वाचा:

बाप-लेक झळकणार एकाच चित्रपटात, कोणती भूमिका साकारणार?

Amit Shah यांचा Uddhav Thackeray यांना टोला, दिला जय भवानीचा नारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss