Friday, May 3, 2024

Latest Posts

Breaking, अजित पवारांनी स्वतःच्या सोशल मीडियावर केले मोठे बदल, राष्ट्रवादीचा वॉलपेपर…

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोबत जाणार अश्या चर्चाना उधाण आले होते. अजित पवार यांनी ४० आमदारांसोबत भाजप मध्ये जाणार आहेत अश्या चर्चा रंगत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे राष्ट्रवादी सोबत जाणार अश्या चर्चाना उधाण आले होते. अजित पवार यांनी ४० आमदारांसोबत भाजप मध्ये जाणार आहेत अश्या चर्चा रंगत आहेत. या सर्व चर्चा चालू असतानाच आता अजित पवार यांच्याकडून एक मोठी घडामोड घडली आहे. अजित पावर यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरील वालपेपर हे डिलीट केले आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात अस्वस्था असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगू लागल्या होत्या. भाजप सह शिवसेनेतील अनेक नेत्यांनी अजित पवार अस्वस्थ असल्याचं बोलून दाखवलं होतं. त्यामुळे अजित पवार कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अश्यातच आज सकाळपासून अजित पवार यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले वॉलपेपर डिलीट केले आहेत. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो कायमस्वरूपी त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या सोशल मिडियावरील फेसबूक आणि ट्विटरवर वॉलपेपर काढून टाकला आहे. अजित पवार यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नाव आणि चिन्ह त्यासोबत शरद पवार यांच्यासोबतचा फोटो लावला होता. तो पोस्ट सहित डिलिट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहे. अजित पवार यांनी यापूर्वी भाजप सोबत काही तासांचे सरकार स्थापन केले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवार यांचे बंड क्षमवलं होतं. त्यानंतर आता अजित पवार हे भाजप सोबत ४० आमदारांना घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी चर्चा सुरू असतांना अजित पवार यांच्या सोशल मिडियावरील वॉलपेपर हटविणे यावरून कुणाला इशारा आहे का? असेही बोलले जाऊ लागले आहे.

हे ही वाचा : 

पुण्यामध्ये गारायुक्त पावसाला सुरूवात, पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा

आमच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना लावली आहे, संजय राऊत

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss