Saturday, April 27, 2024

Latest Posts

Siddaramaiah सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार, २४ नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

आज दिनांक २४ मे २०२३ रोजी कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काँग्रेस हायकमांडने मंत्री करण्यासाठी नेत्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. एकूण २४ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Karnataka Cabinet Expansion : आज दिनांक २४ मे २०२३ रोजी कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. काँग्रेस हायकमांडने मंत्री करण्यासाठी नेत्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. एकूण २४ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

आज सकाळी ११. ४५ वाजता राजभवनात शपथविधी सोहळा होणार आहे. तसे, मंत्रिपदाच्या निवडीबाबत पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडने पाठपुरावा केला आहे.काँग्रेस हायकमांडने राज्यातील सत्ता समीकरण, जिल्हे आणि जातीय समीकरणे लक्षात घेऊन आमदारांची निवड केली आहे. आमदारांच्या नावापुढे त्यांची जातही लिहिली आहे. रहिम खान ही मुस्लिम अल्पसंख्याक समाजातून आली आहे. तर बी नागेंद्र हे एसटी समाजातील आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एच.के. पाटील, कृष्णा बायरे गौडा, ईश्वर खांद्रे आणि दिनेश गुंडूराव हे मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री म्हणून लक्ष्मी हेब्बाळकर या शपथ घेणार आहेत.

तसे पाहता सर्वाधिक ६ आमदार लिंगायत समाजाचे आहेत तर ४ आमदार वोक्कलिगा समाजाचे आहेत. 5 SC/ST आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. तर मागास समाजातील ५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याशिवाय एक मुस्लिम, एक ब्राह्मण, एक नामधारी रेड्डी आणि एक जैन आमदारही मंत्री होणार आहेत.

कोणत्या जातीचे किती मंत्री?

नामधारी रेड्डी 1, वोक्कलिगा 4, एससी-उजवे 1, बनजिगा वीरशैव लिंगायत 1, एसटी 2, ब्राह्मण 1, रेड्डी लिंगायत 1, पंचमशाली लिंगायत 2, अनुसूचित जाती-डावे 1, सदर लिंगायत 1, अनुसूचित जाती-भोवी 1, आदि लिंगायत लिंगायत 1. (BC) 1, मुस्लिम 1, जैन 1, मराठा (BC) 1, राजू (BC) 1, कुरुबा (BC) 1, Ediga (BC) 1.

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss