Friday, April 26, 2024

Latest Posts

शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाचा नवीन निर्णय

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार असून शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजनेचाही लाभ घेता येणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.शेतकऱ्यांसाठी ६ हजारांच्या निधीत आणखी ६ हजारांची भर टाकण्याचा निर्णय झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपये मिळणार आहेत. याचा फायदा १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना होणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प जाहीर करताना याबाबत घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळाने याला मान्यताही दिली आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एका वर्षात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसानप्रमाणे आता ६ हजार रुपये मिळतील.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या वतीनं पीक विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या दोन्ही योजनांवर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागणार आहे. काही शेतकऱ्यांनी या योजनेचं स्वागत करण्यात आलं आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा फायदा राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना होणार असून त्यांच्या खात्यावर अतिरिक्त सहा हजार रुपये जमा होणार आहेत.

हे ही वाचा:

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्मुला

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगल्या गप्पा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss