Monday, May 6, 2024

Latest Posts

CM Shinde यांचा ठाकरेंवर हल्लाबोल, पोराटोरांबद्दल मी बोलत नाही

नुकताच एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवरती कठोर शब्दात टीका केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. मुलाखतीदरम्यान त्यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली आहे. ‘लंडन ते लखनऊ, खोके ते कंटेनर सर्व प्रकारची सर्व कागदपत्र आहेत माझ्याकडे. मर्यादेत राहा, नाहीतर सगळं समोर आणेन आणि तोंड दाखवायला जागा राहणार नाही.’ अश्या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. आदित्य ठाकरेंबद्दल विचारताच पोराटोरांबद्दल मी बोलत नाही असेही ते म्हणाले. आदित्य ठाकरेंवर बोलताना ते म्हणाले, ‘पोराटोरांबद्दल मी बोलत नाही. यांचं वय किती, यांना अनुभव किती, पक्षासाठी यांचं योगदान तरी किती आहे? त्यांच्या वयाच्या दुप्पट पक्षाचं काम केलेले, रक्ताचे पाणी केलेलं लोक पक्षात आहेत. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे आणि हे लोक घरगडी समजतात. यामुळेच हा इतिहास घडला आहे.’ असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचं कॅशचं गोडाऊन एकदा सापडलं होतं, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती, यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘जनतेला माहीत आहे मी कोण आहे आणि माझी कमाई किती आहे. कुणीतरी म्हटलं खोके नाही कंटेनर लागतात, कंटेनर कुठे गेले ते माहीत नाही, खोके मोजल्याशिवाय ज्यांना झोप येत नाही ते आमच्यावर आरोप करत आहे. आमच्याकडे कसलीही प्रॉपर्टी नाही आम्हाला फक्त लोकांची सेवा करायची आहे’ असे ते म्हणाले.

याचसोबत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. मर्यादेबाहेर गेलात तर आमच्याकडे खूप काही आहे. लंडनच्या विश्रांतीचा उल्लेख केल्यानंतर एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं? लखनौमध्ये २०० एकर जमीन चतुर्वेदींची पकडली त्यांच्याबरोबर कोण होत हे सगळं ठाऊक आहे. लँडच्या प्रॉपर्टी कुणाच्या आहेत सगळं माहीत आहे कागदपत्रे देखील आहेत. पण आम्ही मर्यादेत राहतो. वैयक्तिक आरोप करायला  बाळासाहेबांनी आणि आनंद दिघे साहेबांनी नाही शिकवलं. ‘सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पण बाळासाहेबांची संस्कृती विसरले.’ खोके कंटेनर, लंडन, लखनौची जमीन हे सगळं बाहेर काढणार यावर शिंदे म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीस एक मर्यादा आहे. आता त्यांचा बॅलन्स गेलाय. उठता बसता मोदी, शाह, एकनाथ शिंदेंवर टीका करता तुमची पात्रता किती तुम्ही बोलता किती. २०२४ ला ह्यांचा दारुण पराभव होणार आहे.’ असंही ते म्हणाले.

हे ही वाचा:

कच्च्या केळीचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Amit Shah यांचा Uddhav Thackeray यांना टोला, दिला जय भवानीचा नारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss