Saturday, April 27, 2024

Latest Posts

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हेंवर साधला निशाणा,राजकारण हा….

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मतभेद आहेत. हळूहळू राज्यभरात सगळीकडे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (NCP Ajit Pawar) गटाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. खासदार डॉ. कोल्हे यांचा आगामी निवडणुकीत पराभव करण्याचे आव्हान दिले आहे. हे आव्हान दिल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक वाद निर्माण झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली, त्यांचे कार्य घराघरात पोहचवले अशी साद घालतात आणि मते मागतात. पण, २०२२ मध्ये तुम्ही एका चित्रपटात नथुरामची भूमिका केली होती हेदेखील सांगा. फक्त सोयीची असलेली भूमिकांबद्दल का सांगता, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे. नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याचे सांगितल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते तुमचा प्रचार करणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राजकारण हा आपला पिंड नाही ,ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला उभे राहिले आहेत. आढळराव-पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे आणि कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना करावी. आढळरावांची ही घरवापसी आहे,तर तुमचे पक्षांतर झालेले आहे. मतदारांना उपलब्ध होणारा खासदार हवा आणि आढळराव हे लोकांसाठी उपलब्ध असतात, असे अजित पवार म्हणाले.

शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला. या मेळाव्यात अजित पवारांनी पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विद्यमान हे डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. ही अशा प्रकारची डायलॉगबाजी मालिकेत, चित्रपटातच शोभून दिसतात. पण, ही डायलॉगबाजी जनतेसमोर कामी येत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

ठाकरी विचारांचा वारसा मी जपेन, कारण माझे बाबा…काय म्हणाले Amit Thackeray?

चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवेंनी दिली प्रतिक्रिया, मी खैरे यांचं…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss