Wednesday, May 1, 2024

Latest Posts

Baramati मध्ये इतिहास घडणार, Sunetra Pawar दिल्लीत जाणार, Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Constituency) महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी, सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ आज (गुरुवार, १८ एप्रिल) सभा आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह महायुतीचे अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बारामतीत इतिहास घडणार असून सुनबाई दिल्लीत जातील म्हणजे जातील’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, “अजित पवारांनी मागील २५ वर्षे बारामतीचा विकास केला. आज बारामतीचे जे रूप आहे ते अजित पवारांमुळे आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. हि लढाई पवार विरुद्ध पवार किंवा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी नसून देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे. बारामतीचा खासदार मोदींच्या बाजूने उभा राहतो कि राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो हे ठरवणारी हि लढाई आहे. घड्याळ, धनुष्यबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या ते नरेंद्र मोदींना जातं बाकी कोणालाही मत दिल्यास ते राहुल गांधींना जाईल. विकासाला मत द्यायचं कि विनाशाला मत द्यायचं हा निर्णय आता तुमच्या हातात आहे.”

“यंदाची निवडणूक लढताना नरेंद्र मोदी म्हणाले, मागील १० वर्षे फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभि बाकी है… पुढच्या पाच वर्षात बदललेला भारत आपल्याला बघायला मिळेल. यावेळी अब कि बार ४०० पारची घोषणा दिली आहे. यामध्ये, बारामतीतून लोकप्रतिनिधी पाठवला तर मोदींना मोठी मदत होईल, म्हणून सुनेत्रा पवार यांना मतदान केले पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

अब कि बार Sunetra Pawar, Baramati मधून Eknath Shinde यांची घोषणा

अखेर Narayan Rane यांनाच मिळाली Ratnagiri-Sindhudurg मधून उमेदवारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss