Wednesday, May 1, 2024

Latest Posts

अखेर Narayan Rane यांनाच मिळाली Ratnagiri-Sindhudurg मधून उमेदवारी

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा (Ratnagiri – Sindhudurg Loksabha Constituency) तिढा आता सुटला असून महायुतीकडून (Mahayuti) भाजपच्या (BJP) नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपची तेरावी यादी जाहीर झाली असून उमेदवार यादीत नारायण राणे यांना रत्नागिरी – सिंधुदुर्गमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि भाजपमधील या जागेचा तिढा सुटल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेनेच्या किरण सामंत (Kiran Samant) यांनी उमेदवारी मधून माघार घेतली आहे. त्यामुळे, आता नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत (Vinayak Raut) अशी लढत पहायला मिळणार आहे.

आज (गुरुवार, १८ एप्रिल) उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातुन माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या. थोड्याच वेळात भाजपकडून उमेदवारांची तेरावी यादी जाहीर करण्यात आली. त्यात नारायण राणे यांना रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली.

महायुतीमध्ये जागावाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस चालू आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक होता. भाजपच्या नारायण राणे यांनी या जागेवर आपला हक्क सांगितला होता. तर दुसरीकडे शिवसेनाही या जागेसाठी आग्रही होती. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे शिवसेनेकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक होते. नारायण राणे यांनी तर उमेदवारी मिळण्याआधीच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे, रत्नागिरी – सिंधुदुर्ग मध्येच महायुतीत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस चालू होती. आता, नारायण राणे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली असून किरण सामंत यांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.

Latest Posts

Don't Miss