Sunday, May 5, 2024

Latest Posts

EXCLUSIVE शिवसेना प्रमुख आणि ‘ते’ तिघे !

सध्या महाराट्रामध्ये राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून. १० आणि १२ जानेवारी हे दोन दिवस शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis government) भवितव्याचा फैसला करणारे दिवस ठरणार आहेत. कारण १० जानेवारीला सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) एक खटला लढवला जाणार आहे. या खटल्यामध्ये ठाकरे गटांनी ७ खंडपीठासमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर १२ तारखेला धनुष्यबाण (bow and arrow) चिन्हावर कोर्टात तारीख आहे. हे दोन दिवस सरकारसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत. पण आज दिवसभर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे नेते एका मंचावर एकत्र येणार का?, अशी चर्चा रंगत आहे. या तिघांचं एकत्र येण्या मागे कारण आहे कि, येत्या २३ तारखेला बाळासाहेबांच तैलचित्र हे विधानसभेत लावण्यात येणार आहे. बाळासाहेबांची ओळख म्हणजे उत्तम कलाकार, उत्तम व्यंगचित्रकार आणि जबरदस्त वक्ते असे होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत बाळासाहेबांचं तैलचित्र लावून त्यांना मानवंदना देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

२३ तारखेला बाळासाहेबांची ९७ जयंती साजरी करण्यात येणार आहे. याच दिवसच औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत हे तैलचित्र लावणार आहेत. या तैलचित्रासाठी अनेक चित्रकारांची नावे समोर आली होती पण बाजी मारली ती म्हणजे चंद्रकला कुमार कदम (Chandrakala Kumar Kadam) यांनी. त्यांनी आधी केलेली तैलचित्र हे लोकसभेत, विधानसभेत आणि अनेक ठिकाणी लागलेली आहेत. चंद्रकला कुमार कदम यांनी महिनाभर काम केल्यांनतर बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र बनवलेलं आहे. येत्या ४ ते ५ दिवसात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलिबागला (Alibaug) जाऊन ते तैलचित्र पाहणार आहेत. हे तैलचित्र विधानसभेमध्ये लावण्याचा जो सोहळा आहे त्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्रित येणार कि नाही हा कळीचा मुद्दा आहे.

आता पर्यंत मातोश्रीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहित नुसार आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा एकूणच अंदाज घेतला तर, उद्धव ठाकरे हे कर्यक्रमाला जाणार नाहीत. त्यामुळे हा कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना करून घ्यावा लागेल. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (NCP President Sharad) उपस्थित राहणार आहेत पण तितका राज्यशिष्टाचार जर उद्धव ठाकरेंकडून राखला गेला नाहीतर उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाकडे फिरकणार नाही. आता सरकार या सर्व गोष्टीसाठी मोठं मन दाखवणार का हे बघणं महत्वाचं असेल. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांना फोन करणार का? किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनाचा मोठेपणा दाखवला तर तो मातोश्री पर्यंत जाऊन कोण व्यक्त करणार हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी दोन नावं जी चर्चेत आहेत ती म्हणजे राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि उदय सामंत (Uday Samantha). हा कर्यक्रम जो आहे तो महानेत्याच्या मानवंदनेसाठी तैलचित्र विधानसभेमध्ये लावण्यासाठी आहे. आता येत्या काळात उद्धव ठाकरे सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवणार का हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

उर्फीच्या ट्विटवर चित्रा वाघ पुन्हा संतापल्या, पवारसाहेब, सुप्रिया सुळेंना हा नंगानाच चालणार नाही

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, नितीन देशमुखांना एसीबीकडून नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss