Monday, April 29, 2024

Latest Posts

पुणे जिल्ह्यामधील ७१ मंदिरात तोकड्या कपड्यांवर बंदी, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय

राज्यभरातील काही मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून दर्शनास येण्यास बंदी आहेत.

राज्यभरातील काही मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून दर्शनास येण्यास बंदी आहेत. मात्र आता पुणे जिह्ल्यातील एकूण ७१ मंदिरांमध्ये (Pune famouse Temple) आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरांमध्ये दर्शनासाठी प्रवेश करताना तोकडे आणि अशुभनीय कपडे घातलेले चालणार नाहीत. मंदिरात प्रवेश करताना ७१ देवस्थानाने वस्त्र (Clothes)सहिता लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून ओझर येथे घेतलेल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. भीमाशंकर देवस्थान, कसबा गणपती यांच्यासह पुणे शहरातील व पुणे ग्रामीण भागातील मंदिरांचा यामध्ये समावेश आहे. हा निर्णय घेण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मंदिराचे पावित्र्य जपावे, हाच आहे तरी लोकांनी यासाठी सहकार्य करावे, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील ‘या’ मंदिरांचा आहे समावेश

श्री ग्रामदैवत कसबा गणपती,चतुश्रृंगी देवस्थान,श्री भीमाशंकर देवस्थान मंदिर ट्रस्ट,खंडोबा मंदिर कडेपठार,श्री म्हस्कोबा देवस्थान मंदिर ट्रस्ट, भूलेश्वर महादेव मंदिर, श्री क्षेत्र कानिफनाथ गड मंदिर, श्री बनेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, श्री तुकाई माता देवस्थान व सेवा ट्रस्ट, श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट,भैरवनाथ मंदिर देवस्थान, सोमेश्वर महादेव मंदिर,सोरतापेश्वर महादेव मंदिर, सोरतापवाडी,मारुती मंदिर, सोरतापवाडी, म्हस्कोबा मंदिर, कोडीत,अंबामाता मंदिर, मल्लिकार्जुन महादेव मंदिर, गणपती मंदिर, लोणकर मळा, श्री पांडुरंग देवस्थान, मंचर, श्री राधाकृष्ण मंदिर, गोशाळा, हडपसर, जय सियाराम सेवा संस्था ट्रस्ट (श्रीराम मंदिर),काळबोराट नरार, हडपसर, श्री स्वामी समर्थ मठ, काळपडळ, हडपसर, नायडू गगवानी मंदिर, देहू रोड, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान संस्था, ज्ञानेश्वर, महाराजांनी बेद बोलविलेले रेडा समाधी मंदिर, आळे, शंभू महादेव मंदिर, हिवरे, म्हस्कोबा मंदिर, हिवरे, श्रीनाथ म्हसोबा मंदिर, वडगाव बु. पुणे,श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, रांजणी, तालुका आंबेगाव, पुणे, तपनेश्वर सेवा मंडळ ट्रस्ट, मंचर, श्री. गणेश मंदिर, तुकाई नगर प्रतिष्ठान, पुणे, दक्षिण मुखी हनुमान मंदिर, गावडेवाडी, तालुका आंबेगाव, पुणे, वेळेश्वर देवस्थान संस्था, कुरवंडी, तालुका – आंबेगाव, पुणे, यमाई देवी संस्थान, कवठे यमाई तालुका – शिरूर, पुणे, श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबेग तालुका आंबेगाव, पुणे, स्वयंभू मोरया गणपती देवस्थान ट्रस्ट, वडगाव काशिंबे तालुका आंबेगाव, पुणे, कमलजा देवी मंदिर संस्था, शेवाळवाडी, मंचर, तालुका आंबेगाव, पुणे, श्री दत्त मंदिर देवस्थान संस्था, चिंचोडी देशपांडे (लांडेवाडी) तालुका आंबेगाव, पुणे, श्री हरिश्चंद्र महादेव संस्थान, घोडेगाव तालुका – आंबेगाव, पुणे, श्रीराम मंदिर देवस्थान संस्था, चास तालुका आंबेगाव, पुणे, श्री हनुमान मंदिर देवस्थान संस्था, मांदळेवाडी (लोणी) तालुका आंबेगाव या सर्व मंदिराचा यात समावेश आहे.

श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, वडगाव पीर तालुका आवेगाव,श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट गाव साकोरे तालुका आंबेगाव पुणे, श्री महादेव मंदिर देवस्थान संस्था, लोणी तालुका आंबेगाव, पुणे, श्री हनुमान मंदिर ट्रस्ट, लोणी तालुका आंबेगाव, पुणे, श्री भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, खडकवाडी तालुका – आंबेगाव पुणे, श्री गणेश देवस्थान संस्था, वाळुंजनगर (लोणी) तालुका आंबेगाव, पुणे, श्री खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट गाव धामणी, श्री वाकेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्ट, पेठ तालुका – आंबेगाव, पुणे,भार्गव कुदळे पाटील श्रीराम मंदिर, नन्हे,अंबा माता मंदिर, वडगाव (बु), श्रीराम मंदिर ट्रस्ट, हडपसर, श्री मारुती मंदिर महादेववाडी, हडपसर, श्री विठ्ठल मंदिर महादेववाडी, हडपसर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, काळे बोराटे नगर, श्री स्वामी मंदिर देवस्थान, हडपसर,धनेश्वर मंदिर, तानाजी नगर, चिंचवड, श्री गजानन महाराज मंदिर, तळेगांव, श्री राम मंदिर, शितलादेवी, देहू रोड, श्री महालक्ष्मी मंदिर, केशव नगर, वडगाव मावळ, कडजाई माता मंदिर, इंदोरी, संत सावतामाळी विठ्ठल मंदिर, तळेगांव दाभाडे, केदारेश्वर महादेव मंदिर, तळेगांव दाभाडे, श्रीराम मंदिर, आळंदी, कावड महादेव मंदिर, सासवड, बटेश्वर महादेव मंदिर, सासवड, संगमेश्वर महादेव मंदिर, सासवड, दत्त मंदिर, नारायणगाव, दत्त मंदिर, दत्तघाट, नीरा, हनुमान मंदिर, नीरा, महादेव मंदिर, नीराघाट, नीरा, कातोबा मंदिर देवस्थान, दिवेगाव या मंदिरांचा देखील यामध्ये समावेश आहे.

हे ही वाचा:

गुजरातच्या पलीकडे मोदींना देश दिसत नाही; संजय राऊतांची मोदींवर टीका

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा नांदेडमध्ये दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss