Friday, April 26, 2024

Latest Posts

महाबली बजरंगबली पावला काँग्रेसला

कर्नाटक निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. निकालानुसार काँग्रेस स्वबळावर सरकार बनवू शकते. काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केला आहे. काँग्रेसने किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या जेडीएसला देखील धडा शिकवला आहे.

कर्नाटक निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. निकालानुसार काँग्रेस स्वबळावर सरकार बनवू शकते. काँग्रेसने भाजपचा सुपडासाफ केला आहे. काँग्रेसने किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या जेडीएसला देखील धडा शिकवला आहे. मुख्यमंत्री पदाची अपेक्षा ठेवणाऱ्या कुमारस्वामी यांना मोठा धक्का बसला आहे.काँग्रेसने १३६ जागांवर आघाडी घेतली आहे. यापैकी १२१ जांगावर काँग्रेसने विजय मिळवला आहे. तर भाजपला ६४ जागांवर समाधन मानावे लागले. जेडीएसला २० जागा मिळाल्या आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या तुलनेत भाजप आणि जेडीएसला फटका बसला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४, काँग्रेसला ८० आणि जेडीएसला ३७ जागा मिळाल्या होत्या.

हिमाचल प्रदेशपाठोपाठ भाजपने चार महिन्यांत आणखी एक राज्य गमावले आहे. बसवराज बोम्मई सरकारची काँग्रेसने ४० टक्के कमिशन सरकार म्हणून प्रतिमा मांडली. काँग्रेसने दिलेल्या पाच आश्वासनांचा परिणामही निकालावर स्पष्ट दिसत आहे. ध्रुवीकरणाचे राजकारण हे भाजपचे बलस्थान मानले जाते, मात्र यावेळी काँग्रेसने आपले पत्ते चांगले खेळले आणि भाजपला चांगलेच अडकवले.

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे होती. ही काँग्रेसची मोठी युक्ती होती. राज्यात सरकार स्थापन करूनही ते बजरंग दलावर बंदी घालू शकत नाही हे काँग्रेसला आधीच माहीत होते. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकार केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे PFI वर आधीच बंदी आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच पीएफईवर बंदी घातली होती. तर काँग्रेसने ही गोष्ट जाहीरनाम्यात टाकली. हा काँग्रेसचा मोठा डाव होता.

हे ही वाचा:

कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार? दावेदार तीन पण मुख्यमंत्री पदाचा हकदार एकच

फोडाफोडीच्या राजकारणात भीती नाही तर दक्षतापोटी हे सगळं केलं जात असावं – अशोक चव्हाण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss