Monday, May 6, 2024

Latest Posts

महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य, संजय राऊतांच खळबळजनक विधान

सत्तासंघर्षांवर आज संजय राऊत यांनी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी "महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा", खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.

मागील सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाले, आणि महाराष्ट्रामध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात झाली. याच सत्तासंघर्षाच्या संदर्भातील निकाल आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सुप्रीम कोर्टात हजर राहणार आहेत. त्यासाठी ते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. सत्तासंघर्षांवर आज संजय राऊत यांनी दिल्लीतून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य असल्याचा”, खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला.

यावेळी बोलताना राऊत म्हणाले,”सध्या महाराष्ट्र देशातील सर्वात असुरक्षित राज्य आहे. राजकीय खेळीसाठी कुणावरही गुन्हे दाखल केले जातायत. शिवसेनेचे तुकडे करा, हे भाजपचे धोरण आहे. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत आणि त्यासाठीच त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले,” असा आरोप संजय राऊत भाजपावर केला. तसेच ठाकरे गटाच्या अनेक नेत्यावर सध्या कारवाई होत आहे. ठाकरे गटाच्या ३ आमदारांवर एसीबीने नोटीस जाहीर केल्या आहेत. यावर देखील त्यांनी भाष्य केलं. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणले,”आमच्या अनेक लोकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आम्ही अधिवेशनात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे काढली ते एसीबीला दिसत नाही का?,असा सवाल देखील त्यांनी केला. “आमचे कल्याणचे आमदार विजय साळवी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत, तरी देखील त्यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे. महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. देशात सगळ्यात असुरक्षित राज्य महाराष्ट्र,” असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

यापुढे संजय राऊत म्हणाले,”राज्य सरकारमधील मंत्री उघडपणे कुणालाही जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत. स्वार्थासाठी पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडाप्रमाणे करू नका,”असा सल्ला दिला. पुढे त्यांनी, महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होतं. पोलिसांची प्रतिष्ठा जगामध्ये होती. राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राचं नाव बदनाम करू नका. जर तुमच्या अंगात खरोखर रग, मनगटात ताकद असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात बोला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा आदर्श घ्या. स्वाभिमान म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिका, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. यापुढे त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा इशारा देखील दिला.

हे ही वाचा:

कुस्तीचा धुरळा उडणार पुण्यात, पैलवान मैदानात सज्ज

एवढ्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू, बच्चू कडूची शिंदे-फडणवीस सरकारवर मिश्किल टीका

शिवसेना कोणाची? आज होणार सुनावणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss