Friday, May 3, 2024

Latest Posts

PM MODI यांची भूमिका देशाच्या संविधानासाठी घातक- SANJAY RAUT

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केले. प्रधानमंत्री मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ज्या पद्धतीने खाली आणली आहे, ती देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतकं खोटं बोलू नये या मताचे आम्ही आहोत. राजकारणात अनेकजण खोटं बोलतात, पण प्रधानमंत्री पदावरील व्यक्तींना मर्यादा, पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा असली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे

राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये, संसदेमध्ये देखील विरोधकांना महत्त्व आहे. हे मोदी मानायला तयार नाहीत. हा संविधानाला खतरा आहे. मोदींना लोकसभा, विधानसभा या विरोधकांशिवाय हव्या आहेत. मोदींना देशामध्ये पुतीन मॉडेल आणायचे आहे. विरोधक नको, विरोधक जेलमध्ये पाहिजे आहेत. संविधानाला सर्वात मोठा खतरा असेल ते म्हणजे मोदींची विचारसरणी आणि मोदींची भूमिका. खोटं बोलायचं, विरोधकांना बदनाम करायचं, विरोधकांना तुरुंगात टाकायचं, धमक्या द्यायच्या हेच सुरु आहे. सर्व भ्रष्टाचारी आणि खंडणीखोर आपल्या पक्षात घ्यायचे. हाच सर्वात मोठा आपल्या देशाच्या संविधानाला खतरा असल्याचे संजय राऊत म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाबाबत मान्यता दिली आहे. त्याला संविधान तोडणं बोलत नाही, देशाच्या राष्ट्राच्या गरजेनुसार काही बदल करणं म्हणतात, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली

सांगलीच्या जागेबाबत खासदार संजय राऊत म्हणाले की, विशाल पाटील यांच्या भावना आम्ही समजून घेतो. काँग्रेस पक्षाचे ते जुने कार्यकर्ते आहेत. गेली अनेक वर्ष सांगलीत ते काम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सांगलीमध्ये जातीयवादी शक्तींना ताकद मिळाली आहे. प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो आणि दंगली घडवल्या जातात. हे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांना देखील माहीती आहे. सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत. त्यांच्याशी टक्कर घ्यायची असेल तर तिकडे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे, ही जन भावना आहे. आज परिस्थिती अशी आहे की, यांच्याशी मुकाबला करायचा असेल, शक्तींशी मुकाबला करायचा असेल तर तिकडे शिवसेना हवी. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे. त्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेला पूर्णपणे पाठिंबा दिला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड आमच्या भगिनी आहेत

याचबरोबर, संजय राऊत यांनी वर्षा गायकवाड यांच्याबद्दल मत मांडले. आम्ही सगळ्या जागा एकत्र लढू. माझ्या बाजूला भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे उमेदवार बाळ्या मामा उभे आहेत. आम्हाला एकत्र काम करायचे आहे. तिकडची शिवसेना आम्हाला कामाला लावायची आहे. आम्ही असं म्हणत नाही की, भिवंडी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला कशी उमेदवारी मिळाली, नाही. प्रत्येक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे. उमेदवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि ४८ उमेदवारांसाठी आम्ही काम करू. वर्षा गायकवाड आमच्या भगिनी आहेत, आम्ही त्यांची समजूत काढू, असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

Athiya Shetty आणि KL Rahul यांना चिमुकल्याची चाहूल?

घरच्या घरी बनवा बीटरूट जाम

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss