Wednesday, May 8, 2024

Latest Posts

संभाजी महाराज स्वराजरक्षकच, शरद पवार यांचं स्पष्ट मत

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या नावावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. हिवाळी अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं होतं. संभाजी महाराज हे धर्मरक्षक नसून ते स्वराजरक्षक आहेत, असं विधान केलं होतं. त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट आक्रमक झाल्याचं दिसून आलं. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर कुठे त्यांचे प्रतीकात्मक पुतळे सुद्धा पेटवण्यात आले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले की, संभाजी महाराजांना धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक बोलण्यात काही चूक नाही. पण आज पुन्हा शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट मांडली आहे.

शरद पवार यांनी (Sharad Pawar on Sambhaji Maharaj) छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’च असल्याचे आज सांगितले, ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणे यामध्ये काही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले हे परतवून लावले आहेत. दुसरीकडे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहताना छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक असल्याचे पुनरोच्चार केला आहे. पुण्यात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत, असे स्टिकर्सही राष्ट्रवादीकडून वाटण्यात आले. तर दुसरीकडे भाजपने संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत असे स्टिकर्स लावून आंदोलन केले होते.

काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिल्लक सेना असं म्हटलं जात आहे, त्यावर सुद्धा शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असल्याचेही पवार म्हणाले. कुस्तीमध्ये होत असलेल्या डोपिंगवर ते म्हणाले की, कुस्तीच्या बाबतीत असं झालं असेल याची माहिती नाही. आतापर्यंत असं कधी झालं नाही, पोलिसांनी तपास केला असेल तर त्याची माहिती घेऊ.

हे ही वाचा:

Happy Birthday Yash : KGF स्टार यशच्या वाढदिवसानिमित्त खास माहिती

Happy Birthday Yash : KGF स्टार यशच्या वाढदिवसानिमित्त खास माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss