Thursday, May 2, 2024

Latest Posts

राज्याच्या राजकारणात पुन्हा रंगणार काका- पुतण्यांची जोडी

आशिष देशमुख यांनी राहुल गांधी आणि नाना पाटोळे यांच्यावर टीका केली. आणि त्यामुले ते कचाट्यात सापडलेले बघायला माल. राजकारणात आपण कोणत्याही प्रकारे टार्गेट बानू शकतो.

आशिष देशमुख यांनी राहुल गांधी आणि नाना पाटोळे यांच्यावर टीका केली. आणि त्यामुले ते कचाट्यात सापडलेले बघायला माल. राजकारणात आपण कोणत्याही प्रकारे टार्गेट बानू शकतो. तर राजकारणात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणे माजी आमदार आशीष देशमुख यांना महागात पडले आहे. आणि त्यांच्या या वागण्यातून त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. एकीकडे त्यांच्यवार निलंबनाची कारवाई झालेली असताना दुसरीकडे ते बाजार समितीच्या राजकरणात सक्रिय झाले आहेत. तर आशिष देशमुख यांनी त्यांच्या काकांवरच थेट निशाणा साधला आहे.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. तर राजकारणात काका – पुतण्याची जोडी बघायला मिळतेच. त्यापैकी एक जोडी म्हणजे आशिष देशमुख आणि अनिल देशमुख . कारण, काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्यानंतर आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोटपले आहेत. नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे, नरखेड बाजार समितीतील राष्ट्रवादीचे सभापती यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला असून यासंदर्भात उद्या मतदान होणार आहे. तर राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात मोठ्या प्रमाणात संचालक मंडळात नाराजी होती. अविश्वास प्रस्ताव आणण्याकरता १८ पैकी ९ जण लागतात. हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याकरता १२ जणांची गरज असते. आमच्या लोकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. तेव्हा १२ जण आमच्याकडे आले. आता, यासंदर्भात २६ मे रोजी मतदान होईल आणि राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल”, असं आशिष देशमुख म्हणाले.

आशिष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. त्यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाजपला रामराम केला. नंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक देखील लढवली. आता ते पुन्हा भाजपशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे आशिष देशमुख भाजप मध्ये जाणार की काय ? अशा चर्चा राजकारणात सुरु आहे.

हे ही वाचा:

मैदानावरचा “अँग्री यंग मॅन” च्या नावावर आणखी एक विक्रम, आशियामधील पहिला व्यक्ती

देशात पेट्रोल-डिझेलचे दर नवे दर जारी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss